
पाचोरा (जळगाव) : शेतात संपुर्ण काम करत होता. या दरम्यान तहान लागल्याने मुलाला शेजारच्या शेतात असलेल्या विहिरीवरून (Jalgaon News) पाणी आणायला सांगितले. मुलगा गेला देखील, परंतु तो कायमचाच. आई– वडिलांसाठी पाणी आणावयास गेलेल्या मुलाचा अंत झाला. (Tajya Batmya)
जामनेर रोडवरील आर्वे फाट्याजवळ अंतुर्ली येथील वना मोतीराम पाटील हे २० वर्षांपासून डॉ. संघवी यांच्या शेतात मोलमजूरी करून उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे शेतात काम करत असतांना वना मोतीराम पाटील, समाधान उर्फ बाळु वना पाटील, अमोल वना पाटील, आई प्रतिभा वना पाटील (रा. अंतुर्ली) हा परिवार शेतात काम होते. या दरम्यान समाधान उर्फ बाळु (वय २३) यास शेजारील बोहरी यांच्या शेतातील विहीरीवरुन पिण्यासाठी पाणी घेऊन येण्याचे सांगितले.
विहिरीत पडल्याच्या आवाजाने वडील धावले पण..
समाधान हा शेतातील विहीरीवर पाणी आणायला गेला. पिण्यासाठी पाणी काढत असतांना त्याचा विहिरित तोल जाऊन तो विहिरित पडला. बाजूला काम करत असलेले वडील व भाऊ यांना विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी तात्काळ विहीरीकडे धाव घेत पाहिले असता समाधान विहिरित पडला आहे. समाधानला वाचवण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. दोर विहिरित टाकला परंतु समाधानला दोर पकडण्यात अपयश आले. समाधान हा मृत्युशी झुंज देत होता. परंतु वडील देखील काहीच करू शकले नाही. आजूबाजूला कोणीच नसल्याने समाधान बुड़ुन विहिरीत तळासी गेला.
ही बातमी आर्वे, लोहारी गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. आर्वे येथील एकाने समाधानला विहीरीतुन बाहेर काढले. यानंतर त्यास पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.