Jalna News: चिमुकलीच्या जीवावर बेतला कंदुरीचा कार्यक्रम, पाण्यात खेळताना घडली भयंकर घटना

Little girl drowned in water : कंदुरीचा कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणी जवळच असलेल्या ओढ्याच्या पाण्यात खेळायला गेली.
Little girl drowned in water
Little girl drowned in water saam tv

>>लक्ष्मण सोळुंके

Girl drowned in water at sakladi baba dargah: कुटूंबियांसोबत कंदुरीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या चिमुकलीचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यातील सकलादी बाबा दर्गा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. कंचन राजेश शिंदे असं मृत्यू झालेल्या १३ वर्षीय मुलीचं नाव आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील प्रसिद्ध सकलादी बाबा दर्गा येथे कांचन आपल्या कुटूंबियांसोबत गेली होती. यावेळी ती कंदुरीचा कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणी जवळच असलेल्या ओढ्याच्या पाण्यात खेळायला गेली. याठिकाणी खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ती खोल पाण्यात बुडाली.

Little girl drowned in water
Solapur News: आठ दिवसांवर लग्न असताना MSEB कर्मचाऱ्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

बुडत असताना तिचा ओरडण्याचा आवाज ऐकूण तेथील दोघांनी तिला तात्काळ पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळ असलेल्या खाजगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून उपचारासाठी अंबड येथील जिल्हा उपरुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. (Jalna News)

Little girl drowned in water
Buldhana News : पांढरं सोनं क्षणार्धात काळं झालं! वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याच्या स्वप्नांचा कोळसा'

यानंतर नातेवाईकांनी तिला तात्काळ अंबड येथील जिल्हा उप रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी तिला तपासून पाण्यात पडल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com