Jalna News
Jalna NewsSaam tv

Jalna News: आई- वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवस, मुलगा केक आणण्यासाठी गेला अन्‌ घडले भलतेच; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद

आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवस, मुलगा केक आणण्यासाठी गेला अन्‌ घडले भलतेच; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद

जालना : आई– वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला नातेवाईकांच्या भाडणात पडण चांगलेच महागात पडले. ही घटणा बदनापूर (Police) पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या औरंगाबाद पान सेंटरवर घडलीय. या वादात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Tajya Batmya)

Jalna News
Pimpri Chinchwad News: होर्डिंग अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

शिवम कोल्हे असे या तरुणाचे नाव आहे. आई– वडिलांच्या लग्नाचा (Marriage) वाढदिवस असल्‍याने सोमवारी रात्री केक आणण्यासाठी शिवम हा बदनापूरला गेला होता. केक घेत असताना औरंगाबाद (Aurangabad) पान सेंटरवर पानाच्या ८० रुपयांच्या बिलावरून शिवम यांच्या नातेवाईक आणि पान सेंटरवरील मुलात वाद सुरू होता. यावेळी शिवम मध्यस्थी करण्याची गेला असता या वादात पान सेंटरवरील मुलासह दहा ते पंधरा जणांनी शिवमलाही मारहाण केली.

Jalna News
Sushma Andhare: भाजपकडून ‘मविआ’मध्‍ये मिठाचा खडा टाकण्याचे काम; सुषमा अंधारेंचा निशाणा

दरम्यान या घटनेत कुणी तरी धारदार शस्त्राने शिवमवर वार केला. शिवम यांनी या वादातून सुटका करून घेत पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी शिवम कोल्हे यांच्या तक्रारीवरून धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटिव्हीच्या आधारे पोलिस आत्ता हल्ला करणाऱ्या तरुणाचा शोध घेत असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com