Ambadas Danve: नवाब मलिकांना अडकवणं हे राज्य सरकारच षडयंत्र; अंबादास दानवे

नवाब मलिकांना अडकवनं हे राज्य सरकारच षडयंत्र; आंबदास दानवे
Ambadas Danve
Ambadas DanveSaam tv

जालना : राज्यात ज्या पद्धतीने अनिल देशमुख, संजय राऊत यांना अडकवण्याचा प्रयन्त झाला. त्याचं पद्धतीने आज पुन्हा नवाब मलिक (Nawab Malik) यांना अडकवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर केला आहे. (Breaking Marathi News)

Ambadas Danve
महाविकास आघाडीचा पाठींबा कुणाला?; नाशिक पदवीधर मतदार संघ, बैठकीकडे लक्ष लागून

नवाब मलिक आणि त्यांच्या पत्नी विरोधात ज्या पद्धतीने बनावट व्हीजा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे नवाब मलिक यांना अडकवण्याचे महाराष्ट्र् सरकारचे षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

देशातही आघाडीचा यशस्‍वी प्रयोग होईल

दरम्यान देशात भाजप सरकार विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी स्थापन होणार का? असा प्रश्न या वेळी पत्रकारांनी विचारला असता राज्यात आणि केंद्रात येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने विरोधी पक्ष संघटित होत आहे. ज्‍या पद्धतीने राज्यात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक यशस्वी प्रयोग केला. त्याच पद्धतीने केंद्रातल्या भाजप सरकार विरुद्ध देशात महाविकास आघाडीसाठी वेगवेगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो.

असंतुष्ट लाट निर्माण होवू शकते

देशात खासदारांची संख्या पहाता भाजपकडे जरी 303 सदस्य असले; तर विरोधात 244 सदस्य आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्‍वात महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपा सरकार विरुद्ध देशात असंतुष्ट अशी लाट निर्माण होवू शकते अस भाकीत ही यावेळी आंबदास दानवे यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com