लगबग उत्सवाची; बाप्पाच्या गजरात काेकणवासीय परतू लागले गावी

kharepatan
kharepatan

सिंधूदूर्ग : कोकणात गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. काेकणवासीयांनी गावात येण्यापुर्वी काेविड १९ च्या अनुषंगाने तपासणी कराव्यात आणि प्रमाणपत्र घेऊन यावे अथवा जागेवर तपासणी केली जाईल असे नियम प्रशासनाने केले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज झाले आहे. खारेपाटण मुख्य तपासणी नाक्यावर छोट्या वाहनांची तपासणी करून नागरिकांच्या काेविड चाचण्यांची प्रमाणपत्र तपासले जात आहे. त्यानंतरच त्यांना पुढील प्रवासासाठी परवानगी दिली जात आहे. kokan-ganeshotsav-2021-devotees-enters-kharepatan-covid19-test-report-sml80

खारेपाटण मुख्य तपासणी नाक्यापासून एक किलाे मीटर अंतरावर खासगी बसेसची तपासणी केली जात आहे. दोन लस घेतलेले आणि RT-PCR तपासणी केलेले प्रमाणपत्र तपासून सोडले जात आहे. त्याचप्रमाणे एसटी बसमधून येणा-या प्रवाशांची देखील अशाच पद्धतीने तपासणी केली जात आहे.

kharepatan
Video पहा : आले रे आले चोर गणपती आले; उत्सवास प्रारंभ

दरम्यान रत्नागिरी रेल्वे स्थानकावर देखील गणेश भक्त दाखल हाेऊ लागले आहेत. शासनाच्या नियम अटींचे पालन करुन गणेशाेत्सव साजरा करु अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com