Lanja Nagar Panchayat News : १२ नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना; शिंदे - ठाकरे गटामुळे काेकणातील राजकारण तापलं, पुर्वा मुळेंचा आज हाेणार फैसला

आजचा निर्णय मविआला धक्का देऊ शकताे अशी चर्चा काेकणच्या राजकारणात रंगू लागली आहे.
ratnagiri news, lanja nagarpanchayat news, purva mule
ratnagiri news, lanja nagarpanchayat news, purva mulesaam tv

Ratnagiri News : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीच्या (lanja nagarpanchayat) उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे (purva mule) यांना पदावरून हटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गटाकडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या अविश्वास ठरावावर आज (साेमवार) मतदान घेतले जाणार आहे. काेकणातील या राजकीय घडामाेडीकडे शिंदे गटासह (eknath shinde faction) उद्धव ठाकरे गटाचे (uddhav thackeray faction) लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra News)

ratnagiri news, lanja nagarpanchayat news, purva mule
Swabhimani Shetkari Sanghatana News : पाटबंधारे खात्याच्या बंदीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

लांजा कुवे नगरपंचायत शिवसेना शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना व्हिप बजावला गेला आहे. या अविश्वास ठरावच्या घडामोडींवर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे सदस्य सुरक्षित ठिकाणी गेल्याचे समजते.

ratnagiri news, lanja nagarpanchayat news, purva mule
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बावड्यातील शेतकरीच बंटी पाटलांना त्यांची जागा दाखवतील : खासदार धनंजय महाडिक

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर राज्यातील शिवसेनेचे दोन गट तयार होऊन स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ही या बंडाचे थेट परिणाम हाेऊ लागले आहेत. लांजा नगर पंचायतमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 15 सदस्यांसह गटनेते पद हे पूर्वा मुळे यांच्याकडे आहे. त्या सध्या उपनगराध्यक्ष आहेत, नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्यासह 10 जणांनी भाजपचे (bjp) दोन सदस्य घेऊन वेगळा गट तयार केला आहे.

ratnagiri news, lanja nagarpanchayat news, purva mule
Shri Sant BaluMama Trust News : श्री संत बाळूमामा देवस्थानच्या ट्रस्टच्या कार्याध्यक्ष निवड संपन्न; धैर्यशील भोसलेंची अनुपस्थिती

या गटाचे गटनेते पद सचिन डोंगरकर यांना नेमले होते. यावर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. मात्र याचिकावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. वा कोणतेही स्थगिती नाही. पूर्वा मुळे यांच्यावर कारवाई याबाबत आता शिंदे गटाने पूर्वा मुळे यांच्यावर अविश्वास ठरावाचे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाकडे आता भाजपचे दोन सदस्य आणि 08 सदस्य मिळून 10 जणांसह बहुमत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com