Latur News: पिकांना पाणी भरताना रात्रीच्‍या अंधारात झाला घात; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पिकांना पाणी भरताना रात्रीच्‍या अंधारात झाला घात; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Latur News
Latur NewsSaam tv

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी जवळील मोर्तळवाडी येथे एका शेतकऱ्यांचा (Farmer) शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Latur News) रामराव गणपती पेद्देवाड असं या शेतकऱ्यांचे नाव आहे. (Maharashtra News)

Latur News
Aurangabad News: म्हशीने लाथ मारल्याने मृत्‍यूचा बनाव; तपासात धक्‍कादायक वास्‍तव आले समोर

शेतकरी रामराव पेद्देवाड हे गुरूवारी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी खांबावरील विद्युत तार तुटलेली होती. रात्रीच्‍या अंधारात ही तार दिसून आली नाही. यामुळे पिकांना पाणी भरताना शेतकऱ्याच्‍या हातात विद्युत तार आल्याने जोरदार झटका बसला. यामुळे शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती वाढवना पोलीस ठाण्याला समजताच वाढवणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com