Beed Mahaprabodhan Yatra: महाप्रबोधन यात्रेची बीडमध्ये जाहीर सभा, संजय राऊत आणि सुषमा अंधारेंची तोफ धडाडणार

Sushma Andhare And Sanjay Raut Sabha: गंभीर आरोप आणि मारहाणीच्या चर्चेने बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे.
Sushma Andhare And Sanjay Raut
Sushma Andhare And Sanjay RautSaam Tv

Beed News: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर महाप्रबोधन यात्रेची (Beed Mahaprabodhan Yatra) पहिली सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेमध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची तोफ धडाडणार आहे. या सभेत दोघेही कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेपूर्वीच बीडमध्ये ठाकरे गटातील अंतर्गत वाद पाहायला मिळाला. गंभीर आरोप आणि मारहाणीच्या चर्चेने बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे.

Sushma Andhare And Sanjay Raut
Siddaramaiah Swearing In Today: सिद्धरामय्या आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ! डीके शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री; 20 हून आमदारांचाही शपथविधी

बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात आज सायंकाळी 6 वाजता शिवसेना ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा होत आहे. मागच्या काही महिन्यात पहिल्यांदाच बीड शहरामध्ये ठाकरे गटाचा इतका मोठा कार्यक्रम होणार आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेची ही पहिली जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभेत शिवसेना नेते संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे कोणावर हल्लाबोल करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Sushma Andhare And Sanjay Raut
Pune Crime News: धक्कादायक! कंपनी मालकाला धमकावून ५० लाखांच्या खंडणीची मागणी; चौघांना अटक

दरम्यान या सभेपूर्वीच शिंदे गटातला वाद समोर आला आहे. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर तत्कालीन जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांना मारल्याचा दावा देखील केला. त्यानंतर या वादात शिंदे गटाने देखील उडी घेतली आहे. या महाप्रबोधन यात्रेच्या सभेसाठी सुषमा अंधारे यांनी 50 लाख रुपये गोळा केल्याचा गंभीर आरोप देखील शिंदे गटाकडून करण्यात आलाय.

या सभेसाठी वसुली केलेले पैसे परत द्या, अन्यथा ही सभा उधळून लावू, असा इशारा देखील शिंदे गटाचे बीडचे नेते वैजनाथ वाघमारे यांनी दिला आहे. त्यामुळे आता या सभेकडे आणि या सभेतून संजय राऊत आणि सुषमा अंधारे काय बोलणार ? याकडं बीड जिल्ह्याचचे नाही तर राज्याचे लक्ष लागले आहे. वैजनाथ वाघमारे हे सुषमा अंधारे यांचे विभक्त पती आहेत. तसंच सुषमा अंधारे या स्वतः बीडच्या आहेत. त्यांनी स्वतःच्या नेतृत्वात पहिल्यांदाच सभेची तयारी केली आहे. त्यामुळे ही सभा त्यांच्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com