CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्राला काय मिळालं? लाखो कोटींचे करार अन् बेरोजगारांना उपलब्ध होणार नोकऱ्या

या दौर्यात १ लाख ३७ हजार कोटींच्या एमओयूवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSuraj Sawant Saam TV

सुरज सावंत

CM Eknath Shinde: जगभरातील गुंतवणूकदार, उद्योजक आणि अर्थतज्ज्ञ यांचा वार्षिक मेळावा दावोस येथे सुरू आहे. यंदा या मेळाव्यात महाराष्ट्राने मोठी भरारी घेतली आहे. या दौर्यात १ लाख ३७ हजार कोटींच्या एमओयूवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत आणि १ लाख रोजगार महाराष्ट्रासाठी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. (Latest CM Eknath Shinde News)

दावोस येथून माध्यमांशी बोताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, " दावोसच्या वल्ड इकोनॉमिक कोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मादींची छाप पहायला मिळाली आहे. या दौर्यात महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर उद्योजकांनी साथ दिली. जवळपास १ लाख ३७ हजारा कोटींचे MOU रजिस्टर करण्यात आले आहेत. विविध कंपनया महाराष्ट्रात गुंतवूक करण्यासाठी इच्छूक असल्याचे दिसत आहे. उद्योजकांनी दाखवलेल्या विश्वासानुसार राज्यसरकार त्यांना सहकार्य करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला आहे.

" विविध क्षेत्रात ही गुंतवणूक होतं आहे. हायटेक आणि इन्फ्रास्टक्चर इंडस्ट्रीमध्ये ५४ हजार २७६ कोटींची गुंतवणकीवर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. यामुळे ४ हजार ३०० नोकऱ्या उपलब्ध होतील. यात ६ कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे. एनर्जी सेक्टरमध्ये इलेक्ट्रीक वेकलमध्ये ४६ हजार ८०० कोटींचे एमओयूवर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. ज्यामुळे ४५ हजार रोजगार उपलब्ध होतील.", असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Eknath Shinde
Eknath Shinde: दे दणादण! क्रिकेटच्या मैदानावर CM शिंदेंची जोरदार बॅटिंग; Video Viral

दावोसबाबत सांगताना ते पुढे म्हणाले की, " आयटी फिन्टेक आमि डेटा सेटरमध्ये ३४ हजार ४१४ कोटींचे एमओयूवर स्वाक्षरी झाल्याअसून त्यामुळे ८ हजार रोजगार उपलब्ध होतील. स्टिल मॅनिफेक्चरिंगमध्ये २२०० कोटींच्या एमओयूंवर स्वाक्षर्या झाल्या असून त्यामुळे ३ हजार रोजगार उपलब्ध होतील. तर अॅग्रो आणि फूड प्रोसेसिंगमध्ये १९०० कोटींचे एमओयूंवर स्वाक्षरी झाल्या आहेत. त्यामुळे जवळपास ६०० रोजगार उपलब्ध होतील."

CM Eknath Shinde
Cm Eknath Shinde | महाराष्ट्रात 45 हजार कोटींची गुंतवणूक #cmshinde #daoos #udaysamant

" या मुळे या दौर्यात १ लाख ३७ हजार कोटींच्या एमओयूवर स्वाक्षर्या झाल्या असून १ लाख रोजगार यामुळे उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीन ही समाधानाची बाब आहे. हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. उद्योजकांसाठी आमच्या सरकारने एक नवी पॉलिसी बनवली आहे. त्यात सिंगल व्हिंडो क्लेअरन्स असेल, कॅपिटल सबसिडी असणार आहे. GST टॅक्स सबसिडी असेल, मोठ्या उद्योजकांना विशेष पॅकेज दिले जाणार आहे. उद्योजकांना रेड कारपेट सरकारकडून असेल मोठ्या प्रमाणात त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. " असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com