Maharashtra Jail News: आता कारागृहातील वयोवृद्ध कैद्यांना लागणार चांगली झोप, अपर पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय

Maharashtra Jail News: राज्यातील कारागृह विभागातील अडीअडचणी दूर करण्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी आढावा बैठक आयोजित केली होती.
Maharashtra jail News
Maharashtra jail Newssaam news

Maharashtra Jail News: महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांच्या दृष्टीकोणातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील कारागृहात असलेल्या ५० पेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना आता बेड आणि उशी मिळणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांनी हा निर्णय घेतला आहे.

अमिताभ गुप्ता यांनी कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक आणि सर्व कारागृहांचे अधीक्षक यांच्यासोबत 15 फेब्रुवारी रोजी बैठक घेतली होती. यावेळी ५० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन कैद्यांना साधारणतः जाड बेड (अंथरून) तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Maharashtra jail News
Pune: दुर्दैवी! पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; २ वर्षीय चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

कारागृह विभागातील अडीअडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. कारागृहातील ५० वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले बंदी आणि काही वयोवृद्ध बंदी आजारी असतात. अशा कैद्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra jail News
HSC Exam 2023: बारावी परीक्षेत पहिल्याच पेपरमध्ये चूका, विद्यार्थ्यांना मिळणार आयते ६ गूण; प्रश्नांऐवजी छापून आली चक्क...

दरम्यान वयोवृद्ध कैद्यांना बेड आणि उशी आणण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यासाठी तुरुंग प्रशासनाने काही निकष ठरवले आहेत. यासाठी तुरुंग प्रशासनाकडून बेडच्या उंची आणि रुंदीसाठी परिपत्रकही जारी केले आहे, जेणेकरून सर्व कैद्यांच्या बेडचा आकार समान असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com