
Pune News: सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) बोर्डाने नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. लवकरच या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण दहावी (10th Result) आणि बारावीचा निकाल (12th Result) लवकरच जाहीर होणार आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्यामुळे एकीकडे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता तर आहे पण किती टक्के गुण मिळणार याची धाकधुक देखील त्यांच्या मनात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी सध्या सुरू आहे. या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याबाबची विचारणा राज्य मंडळ विभागीय मंडळाकडे सातत्याने होत आहे.
याच दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होईल. तसंच निकालाबाबत लवकरच अधिकृतपणे माहिती देण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती. 2 ते 25 मार्च या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झाली होती. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत 14 लाख विद्यार्थी बसले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.