
Vidhan Sabha News: राज्याचं राजकारण अतिशय टोकाच्या टिकेने आणि वैयक्तिक आरोपांनी गढूळ झाल्याचे चित्र गेल्या काही काळात निर्माण झाले होते. परंतु आज विधानसभेत रंगलेल्या काही विनोदांनी हे वातावरण थोडं का होईना हलकं फुलंक झालं.
विधिमंडळात चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लग्नाच्या विषयावरून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना एक कोपरखळी लगावली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील त्याच्या कोपरखळीवर विनोदी शैलीत पलटवार केला. यामुळे विधानसभेतील सदस्य खळखळून हसले.
बच्चू कडू यांनी प्रकल्प बंद झाल्यामुळे कामगार रस्त्यावर येत असल्याचा विषय मांडताना आधी लग्न जमलं आणि आता तुटलं त्याची जबाबादारी कोण घेणार असा प्रश्व विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बच्चू कडू यांनी लग्नाचा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून का विचारला होता का? यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला.
यानंतर फडणवीस म्हणाले 'सरकार जबाबदारी घेण्यास तयार आहे'. फडणवीसांच्या या उत्तरानंतर पुन्हा एकदा विधासभेत हशा पिकला. यानंतर आदित ठाकरे बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी फडणवीसांच्या कोपरखळीवर विनोदी शैलीत पलटवार केला. 'ही काही राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देतो, नाहीतर आमच्या सोबत बसा' असे म्हणत आदित्य ठाकरेंनी पलटवार केला. (Latest Marathi News)
यानंतर विधानसभा अध्यक्षांनी देखील प्रतिक्रिया देत आदित्यजी आधी लगीण कोंडाण्याचे' यानंतर पुन्हा एकदा सभागृह खळखळून हसले. यावर पुन्हा बोलताना फडणवीस म्हणाले, कुणाचंही तोंड कसं बंद करायचं यावर उत्तम उपाय... अनुभवातूनच बोलतोय'.
फडणवीसांच्या या शाब्दिक कोटीनंतर पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात थोडा वेळा का होईना रंगलेल्या या विनोदी जुगलबंदीमुळे विधानसभेतील वातावरण हलकंफुलकं झालं.
Edited By - Chandrakant Jagtap
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.