Eknath Khadse Meet Ravikant Tupkar : रविकांत तुपकर राष्ट्रवादीच्या वाटेवर....? एकनाथ खडसेंसोबत बंद दाराआड चर्चा

Ravikant Tupkar on the way to NCP? : बुलढाण्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड जवळपास एक तास चर्चा झाली.
Eknath Khadse Meet Ravikant Tupkar
Eknath Khadse Meet Ravikant TupkarSAAM TV

Maharashtra Politics : आगामी विधासभा निवडणुकीपूर्वी राज्यात सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. आत बुलढाण्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याला कारणही तसंच आहे. आज बुलढाण्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड जवळपास एक तास चर्चा झाली. त्यामुळे रविकांत तुपकर राष्ट्रवादीच्या वाट्यावर तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Eknath Khadse Meet Ravikant Tupkar
Nana Patole News: हा खेळ तर... महाविकास आघाडीबाबत नाना पटोले जरा स्पष्टच बोलले

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे हे बुलढाणा येथे जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी रविकांत तुपकर आणि एकनाथ खडसे यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली.

या भेटीमुळे रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा बुलढाण्यात रंगू लागली आहे. यावर रविकांत तुपकर यांना विचारलं असता त्यांनी सध्या काहीच बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

Eknath Khadse Meet Ravikant Tupkar
Eknath Khadse: ...तर शिंदे गटातून आमदार बाहेर पडतील; आमदार एकनाथ खडसे यांचा दावा

दरम्यान स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आणि स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यात गेल्या वर्षभरापासून बेपनाव असल्याच्या चर्चा आहे. त्यांच्यातील मतभेत लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे रविकांत तुपकर हे नाराज असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर आणि एकनाथ खडसे यांची भेट झाल्याने तुपकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com