Maharashtra Politics: कुपोषित बालकासोबत मैत्री करून काय फायदा; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Politics: नाशिकच्या मालेगाव येथील झोडगे येथे मंत्री गुराबराव पाटील यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे भूमी पूजन झाले.
Gulab Raghunath Patil
Gulab Raghunath Patilsaam tv

> अजय सोनवणे, मनमाड

Maharashtra Politics: मित्र मिळाला तर तो पहिलवान असला पाहिजे, कुपोषित बालकासोबत मैत्री करून काय फायदा, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना गुलाबराव पाटलांनी ही टीका केली आहे.

Gulab Raghunath Patil
Sonia Gandhi: सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, रायपूर अधिवेशनात केली घोषणा

गुलाबराव पाटील म्हणाले, 'मित्र मिळाला तर तो पहिलवान असला पाहिजे, कुपोषित बालकासोबत मैत्री करून काय फायदा? आपची महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत आहे, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

नाशिकच्या मालेगाव येथील झोडगे येथे गुराबराव पाटील यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे भूमी पूजन झाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतना उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

Gulab Raghunath Patil
Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, 'मी पुराव्याशिवाय...'

शुक्रवारी अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर केजरीवाल यांनी सांगितले की, आम्ही देशातील परिस्थितीवर चर्चा केली. महागाई वाढत आहे, मात्र सर्वसामान्यांची कमाई वाढत नाही. केंद्र सरकार काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी यावेळी बोलताना केला. (Latest Political News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com