Tanaji Sawant on Sharad Pawar: 'त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल मत मांडावं, आमची काळजी करू नये; तानाजी सावंत यांची पवारांवर टीका

Latest Marathi News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये शिवसेना-भाजप यांच्या संबंधांबाबत केलेल्या टिप्पणीवरून तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Tanaji Sawant on Sharad Pawar
Tanaji Sawant on Sharad Pawarsaam tv

>> कैलास चौधरी

Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये शिवसेना भाजप यांच्या संबंधांबाबत केलेल्या टिप्पणीवरून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपलं मत त्यांच्या पक्षाबाबत व्यक्त करावं, आमच्या शिवसेनेची काळजी करू नये अशा शब्दात आरोग्य मंत्री सावंत यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्रामध्ये शिवसेना भाजप यांच्या संबंधाबद्दल टीका टिप्पणी केली आहे. यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावरून सावंत यांनी आज शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Tanaji Sawant on Sharad Pawar
Sanjay Raut on Mohit Kamboj: 'बारमध्ये रात्री 3 वाजता भाजप नेत्याने घातली पोलिसांशी हुज्जत', राऊतांचा खळबळजनक दावा, थेट फडणवीस यांना लिहिलं पत्र

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असं सांगत उद्या काहीही घडू शकतं असं मत तानाजी सावंत यांनी व्यक्त केलं. तसेच त्यांना आमच्या पक्षाची पॉवर ऑफ ॲटर्नी दिली नसल्याचेही सावंत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन 2 मे रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे.

या पुस्तकात देशासह राज्याच्या राजकारणात अलिकडच्या काळात झालेल्या बदलांवर भाष्य करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची निर्मिती आणि सध्याच्या काळात राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींचा उल्लेख देखील लोक माझा सांगातीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे या अत्मचरित्राविषयी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे.

Tanaji Sawant on Sharad Pawar
Pune News: फटा पोस्टर निकला झिरो! गर्लफ्रेन्डला इम्प्रेस करण्यासाठी बनला पोलीस, रात्री गस्तही घालायचा, पण...

राज्याच्या राजकारणात 2019 पासून अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. पहाटेचा शपथविदी, महाविकासआगाडीची स्थापना आणि आता मविआचा एक भाग असलेल्या शिवसेनेतील बंड आणि त्यामुळे कोसळलेलं सरकार या सर्व घडामोडींचे शरद पवार स्वत: साक्षीदार होते.

त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राची उत्सुकता राजकारणाची आवड आणि उत्सुकता असलेल्या सर्वांना आहे. पवारांच्या 'लोक माझे सांगाती'च्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन 2 मे रोजी मुंबतील यशवंतराव चव्हण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com