Maharashtra Untimely Rain: अवकाळीने महाराष्ट्र हादरला! भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू, वीज पडून शेतकरी ठार, कित्येक जनावरांचा बळी

Bog loss in state due to unseasonal rains: हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
Maharashtra Untimely Rain
Maharashtra Untimely Rainsaam tv

Maharashtra Untimely Rain News: हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगावसह तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक हिरावलं गेलं. या पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा मोठ नुकसान झालं आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

भिंत कोसळून दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातलं. यात संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथील गणेश बोरकर यांच्या घराची भिंत कोसळून त्याखाली दोन मुली दबल्याची घटना घडली. कृष्णाली आणि राधा असे या मुलींची नावे आहेत. घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि दोघींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी दोन वर्षीय कृष्णाली हिला तपासून मृत घोषित केलं तर राधावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे

Maharashtra Untimely Rain
Video पाहा : महाराष्ट्रात Corona चा विळखा; Pandharpur च्या विठुरायाच्या दर्शनाला निघालात ? थांबा ! नवा नियम वाचा

वीज अंगावर पडून 40 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. खामगाव तालुक्यात अंबिकापुर शेत शिवारात वीज पडून गोपाल महादेव कवळे या चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

वीज कोसळल्याने 8 शेळ्या ठार

बुलढाण्यातील पळशी गावात वीज पडल्याने एका शेतकऱ्याच्या तब्बल 8 बकऱ्या ठार झाल्या आहेत. सातत्याने अवकाळी ढग शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

रत्नागिरीत अवकाळी पावसाने दाणादाण

कोकणात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरीत अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्यांचे देखील नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते आहे.

Maharashtra Untimely Rain
Boyfriend Leaked Girlfriend's Chat : आई... मी चुकीच्या मुलीसोबत अडकलो गं! तरुणाने लीक केले प्रेयसीसोबतचे चॅट

सिंधुदुर्गलाही अवकाळीने झोडपले

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सावंतवाडीतील आंबोली, चौकुळ, गेळे परिसरात तासभर पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन ते तीन दिवसापासुन वातावरणात चांगलाच उकाडा जाणवत होता. दरम्यान आज अचानक पाऊसाच्या सरी कोसळल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. (Maharashtra Rain Update)

साताऱ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी

सातारा शहरासह ग्रामीण भागात आज चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सातारा शहरासह ग्रामीण भागात सामान्य जनतेची चांगली तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वारा आणि विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने साताऱ्याला चांगलच झोडपून काढले

यवतमाळ शहराला अवकाळीचा फटका

यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आला. यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. आज पावसाने विजेच्या कडकडाासह जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी शेतात उभ्या असलेल्या गव्हाच्या पिकाला या पावसाचा फटका बसला.

Maharashtra Untimely Rain
Kalyan Crime News: पोलिसांना कारवाईपासून रोखण्यासाठी महिलांनी काढले कपडे, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

वीज पडून दोन बैल जागीच ठार

यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली, तर काही घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने ९ एप्रिल पर्यंत वर्तविला आहे. जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील थार बुद्रक येथे वीज पडून दोन बैल जागीच ठार झाले.

वर्ध्यात विजांचा कडकडाटांसह गारपीट

वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पुलगाव परिसरातील काही भागात पावसासह गारपीट झाली. येथे जवळपास अर्धा तास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

धुळ्यात शेती पिकाला फटका

साक्री आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकाला देखील फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com