Beed Fire News : ऑइल मिलला भीषण आग; लाखो रुपयाचे सरकीचे पोते, साहित्य जळून खाक

रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान अचानक ऑईल मिलला आग लागली.
beed
beedsaam tv

Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील ऑइल मिलला भीषण आग लागली हाेती. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे. या आगीत लाखो रुपयांचे सरकीचे पोते आणि साहित्य जळून खाक झाले आहे. (Maharashtra News)

beed
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बंटी पाटील, बिंदू चौकात या ! अमल महाडिकांचं Open Challenge

बीडच्या माजलगाव शहरापासून दोन किलाे मीटर अंतरावर असणाऱ्या मुंदडा उद्योग समूहाच्या ऑईल मीलला आग लागली. मध्यरात्री लागलेल्या आगीत सरकीची हजारों पोते व साहित्य जळून खाक झाली असून मोठी आर्थिक हानी झाली आहे.

माजलगाव तालुक्यातील केसापुरी शिवारात माजलगाव – गेवराई रोडवर रामदयाल मुंदडा यांचे मुंदडा उद्योग समूह आहे. या ठिकाणी त्यांची दालमिल व ऑईल मिल आहे. रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान अचानक ऑईल मिलला आग लागली. या आगीत सरकी असलेले हजारो पोते जळून खाक झाली आहेत, तसेच लाखो रुपयांचा बारदाना देखील जळाला आहे.

beed
Swabhimani Shetkari Sanghatana News : ...अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; 'स्वाभिमानी'चा सरकारला इशारा

आगीची (fire) भीषणता खूप असल्यानं माजलगाव नगर परिषदचे अग्निशमन दल (fire brigade), मानवत नगर परिषदचे अग्निशमन दल, गेवराई नगर परिषदचे अग्निशमन दल, बीड नगर परिषदचे अग्निशमन दल, धारुर नगर परिषदचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न होत आहेत.

आग नेमकी कशामुळे लागली ? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. आग लागल्यानंतर जोराची हवा सुटल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. दरम्यान आज सकाळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com