Maval Market Committee Election Result : भाजपचा बालेकिल्ला ढासळला, मावळात 'मविआ' चा डंका

या निवडणुकीतून मावळच्या एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावून आता मावळ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाल्याचे स्पष्ट झाले.
mla sunil shelke, Maval Market Committee Election Result,
mla sunil shelke, Maval Market Committee Election Result, saam tv

Maval Krushi Utpanna Bazar Samiti Result : राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या बाळा भेगडेंना पुन्हा एका दे धक्का दिला आहे. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. महाविकासच्या विजयामुळे मावळचा भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे. (Breaking Marathi News)

mla sunil shelke, Maval Market Committee Election Result,
Nitesh Rane On Sanjay Raut : लक्षात ठेवा, आता नऊ वाजताचा भोंगा बंद करण्याची जबाबदारी माझ्यावर; नितेश राणेंचा संजय राऊतांना सज्जड दम (पाहा व्हिडिओ)

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने बहुमत मिळवले. तर या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (former mla bala bhegade) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

मावळ कृषि उत्पन्न बाजार समितीतील भाजपच्या माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके या दोघांनीही आपल्याच पॅनेलचा विजय होणार असल्याचा दावा केला होता. यात सुनील शेळकेंचा दावा खरा ठरला.

mla sunil shelke, Maval Market Committee Election Result,
Shirdi Bandh च्या निर्णयावर राधाकृष्ण विखे-पाटलांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती (पाहा व्हिडिओ)

बाजार समितीच्या निवडणुकीत परिवर्तन घडविण्यासाठी भाजपने महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचा एक गट फोडला होता. तर दुसरा राष्ट्रबादीबरोबर होता. तरी देखील राष्ट्रवादी महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवत मावळ कृषी समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

mla sunil shelke, Maval Market Committee Election Result,
Nitesh Rane यांना लाेक पळवून लावतील, हिंमत असेल तर बारसूत जा; वैभव नाईकांचे आव्हान

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल

18 पैकी 18 जागांचा निकाल जाहीर

राष्ट्रवादी महाविकास आघाडी

राष्ट्रवादी - 15 जागांवर विजयी

काँग्रेस - 02

उद्धव ठाकरे गट - 00

भाजपा महायुती

भाजप - 01 जागेवर विजय

शिवसेना शिंदे गट - 00

अपक्ष - 00

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची एकहाती सत्ता.

महायुतीला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com