
नवनीत तापाडिया, साम टिव्ही
औरंगाबाद : शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संतोष बांगर हे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण करताना दिसून येत आहे. यावरून बांगर यांच्यावर तातडीने कारवाई करा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर स्वत: संतोष बांगर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाले संतोष बांगर?
आमदार संतोष बांगर हे आज औरंगाबादेत आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला, असा आरोप आमदार बांगर (Santosh Bangar) यांनी केला. महिलेची अब्रु चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो. नाहीतर या प्राचार्यावर आम्ही गुन्हा दाखल केला असता, असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
सरकारमध्ये असलं म्हणून आवाज उठवायचा नाही का? आम्ही काय हातात बांगड्या घातल्या आहेत का?, असा सवाल आमदार बांगर यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर, महिलेवर अत्याचार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नाही, असा इशाराही बांगर यांनी दिला आहे. (Maharashtra Political News)
'सरकारमध्ये असलो म्हणून आवाज उठवायचा नाही, हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं नाही.हा प्रकार होऊन ८ दिवस झाले. मात्र, या प्राचार्याने आजवर माझ्या विरुद्ध का तक्रार दिली नाही? सरकार आमचंच, मात्र सरकारमध्ये राहून आवाज उठवावा लागतो, आम्ही काय हातात बांगडया घातल्यात का? असंही बांगर म्हणाले.
काय आहे प्रकरण?
आमदार संतोष बांगर हे नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात सापडत असतात. काही दिवसांपूर्वी बांगर यांनी एका शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करताना व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झाला होता. आता तर बांगर यांनी थेट हिंगोलीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यालाच मारहाण केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.