मोबाईल चोरट्यास वजिराबाद पोलिसांकडून अटक; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त

वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना पोलिस ठाण्याच्या हद्दीत व मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा घालून आरोपींना अटक करण्याच्या सुचना दिल्या.
मोबाईल चोरट्यास वजिराबाद पोलिसांकडून अटक; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त
वजिराबाद पोलिसांची कारवाई

नांदेड : मागील काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर, डॉक्टर लेनमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून सकाळच्या वेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत असताना त्यांचे मोबाईल व किमती सामान चोरणाऱ्या अटल चोरट्याला वजिराबाद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख 76 हजार 458 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना पोलिस ठाण्याच्या हद्दीत व मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा घालून आरोपींना अटक करण्याच्या सुचना दिल्या. होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करावी असे आदेश दिल्यानंतर गुन्हे शोध पथकाने डॉ. लाइन भागांमध्ये सापळा रचून गुन्हेगारांचा शोध घेणे सुरु केले.

हेही वाचा - नांदेड : जिल्ह्यातील गहाळ झालेले आठ लाखाचे मोबाईल शोधले- स्थानिक गुन्हे शाखा

ता. 10 जुलैच्या रात्री मोबाईल चोर रेल्वे स्टेशन येथे असून तो चोरीचे मोबाईल घेऊन हैदराबाद येथे जात असल्याचे माहिती पथकातील फौजदार प्रविण आगलावे यांना मिळाली. माहिती समजताच त्यांनी त्याठिकाणी जाऊन राजू देविदास वाघमारे रा. बळीरामपूर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पाच चोरीचे अँड्रॉइड मोबाईल मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. त्याला अधिक विश्वासात घेतले असता तपासादरम्यान तेरा अँड्रॉइड मोबाईल, एक सोन्याची साखळी, दोन कानातील टॉप्स, दोन अंगठ्या असा एकूण एक लाख 76 हजार 458 रुपयांचा ऐवज पोलिसांना त्याने काढून दिला.

वजिराबाद पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, सिद्धेश्वर मोरे, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील प्रवीण आगलावे, दत्‍ताराम जाधव, विजयकुमार नंदे, गजानन किडे, मनोज परदेशी, चंद्रकांत बिराजदार, संतोष बेलरोड, वेंकट गांगुलवार, बालाजी कदम, शेख इब्राहिम, शरदचंद्र चावरे यांनी केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com