नांदेड : जिल्ह्यातील गहाळ झालेले आठ लाखाचे मोबाईल शोधले- स्थानिक गुन्हे शाखा
आठ लाखाचा मोबाईल शोधले

नांदेड : जिल्ह्यातील गहाळ झालेले आठ लाखाचे मोबाईल शोधले- स्थानिक गुन्हे शाखा

गहाळ (हरवलेल्या) झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या.

नांदेड : जिल्ह्यात व शहरात सार्वजनिक ठिकाणी व आठवडी बाजारात महागडे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात होत असतात. या घटना वाढत असल्याने मोबाईलधारक हैराण झाले आहेत.

गहाळ (हरवलेल्या) झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शहरात कार्यरत केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला असता वजिराबाद हद्दीतील अठरा, शिवाजीनगर आठ, भाग्यनगर नऊ, विमानतळ पाच, नांदेड ग्रामीणमध्ये सहा, कंधार व देगलुर प्रत्येकी एक असे एकूण 51 मोबाईल (किंमत आठ लाख एक हजार 900 रुपये) असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - अतिवृष्टीत जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ७७ शेतकर्‍यांचे तीन हजार ३३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरुन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, हवालदार शेख चाँद, गंगाधर कदम, सखाराम नवघरे, संजय केंद्रे, दसरथ जांभळीकर, विश्वनाथ इंगळे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, बजरंग बोडके, गणेश धुमाळ, विलास कदम, राजू सिटीकर व श्री ओढणे यांनी परिश्रम घेतले

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com