
Monsoon Update: देशभरातील जनतेसोबत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. यावर्षी देशात मान्सून (Monsoon 2023) उशीरा दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. स्कायमेट वेदर (Skymet Weather Update) या खासगी संस्थेने मान्सून अंदमानमध्ये उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने तो उशीरा दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरवर्षी 22 मे रोजी मान्सून देशात दाखल होत असतो. 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमनच उशीराने होणार आहे. मोचा चक्रीवादळ आणि बदललेल्या वातावरणामुळे मान्सून दाखल होण्याची तारीख पुढे गेल्याचे सांगितले जात आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिरा दाखल होणार असल्यामुळे केरळमध्ये देखील तो उशीरा दाखल होणार आहे. तळकोकणात मान्सून 7 जून रोजी दाखल होईल. तर मुंबईमध्ये 11 जूनला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी अंदमानमध्ये मान्सून 15 मे रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण मोचा चक्रिवादळामुळे मान्सूच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. अशामध्ये मान्सून 19 ते 20 मेपर्यंत दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोचा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत चालली आहे त्यामुळे त्याचा परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होत आहे. या चक्रीवादळामुळे मान्सून अंदमानात उशीराने दाखल होणार असल्यामुळे त्याच्या पुढच्या दिशेच्या वाटचालीवर परिणाम होण्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील जनता ही उकाड्यामुळे हैराण झाली आहे. उकाडा आणखी वाढत चालला आहे. अशामध्ये शेतकऱ्यांपासून प्रत्येक जण मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. पण आता मान्सून उशीरा दाखल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण शेतकरी मान्सूनच्या अंदाजावरुनच शेतीच्या कामाला लागतात. दरम्यान, राज्यातील उन्हाचा तडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज तापमान साधारण असलं तरी उद्यापासून म्हणजेच 17 मेपासून उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.