Nagpur Crime News: क्रिकेटने घेतला आई अन् लेकराचा जीव; दोघांवर एकाचवेळी झाले अंत्यसंस्कार

Crime News: नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ही खळबळजनक घटना घडलीये.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV

Nagpur News: सध्या आयपीएलची सर्वत्र धुमधाम सुरु आहे. अशात अनेक तरुण मंडळी या मॅचच्या नावाखआली क्रिकेट सट्टा लावतात. या सट्ट्यानं एका मुलाचा आणि त्याच्या आईचा जीव घेतला आहे. क्रिकेटच्या सट्ट्यात हारल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मुलाच्या आत्महत्येचा धसका बसल्याने त्याच्या आईने देखील आपलं जीवन संपवलं आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलीये. (Latest Crime News)

क्रिकेटमध्ये गमावले ६ लाख

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खितेश वादवानी असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने क्रिकेट सट्ट्यात सहा लाख रुपये गमावले होते. पैसे हारल्याने त्याच्यावर बुकिंगचा दबाव होता. त्यामुळे २० वर्षीय खितेशने या संकाटातून बाहेर पडण्यासाठी आपले जीवन संपवले. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ही खळबळजनक घटना घडलीये.

Nagpur Crime News
Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये युवकाची गोळ्या झाडून हत्या, परिसरात तणावाचं वातावरण

आईनेही घेतलं विष

मुलाच्या निधानाची बातमी समजताच त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. खितेश आईचा फार लाडका होता. त्यामुळे त्याच्या आईला हा धक्का पेलवला नाही. मुलगा खितेशने आत्महत्या केल्याचं माहिती पडल्यानंतर आईने देखील विषारी द्रव्य पिऊन मृत्यूला कवटाळले.

एकाच वेळी आई अन् मुलावर अंत्यसंस्कार

खितेशच्या कुटुंबात त्याचे आई बाबा आणि बहिण असा परिवार राहत होता. एकाच वेळी कुटुंबातील दोन्ही व्यक्तींनी आपलं जीवन संपवल्याने बहिण आणि वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आई आणि मुलावर एकाच वेळी केले अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मुलगी आणि वडील मानसिक धक्क्यात आहेत.

Nagpur Crime News
Hingoli Crime News: दारुड्या मुलाने बापासमोरच आईसोबत केलं भयंकर कृत्य, ऐकून तुमचाही राग होईल अनावर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com