Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस चे ओबीसी कार्ड

ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत होणार; - भाजपकडून बावनकुळे तर कॉंग्रेसकडून मुळकांना उमेदवारी ?
Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस चे ओबीसी कार्ड
चंद्रशेखर बावनकुळे । राजेंद्र मुळक SaamTvNews

ना ग पू र : विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत ओबीसी कार्ड खेळलंय. तर इकडे काँग्रेस कडून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळं भाजपच्या ओबीसी कार्डला काँग्रेसनं ओबीसी उमेदवार देऊन उत्तर दिलंय. त्यामुळं या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना रंगणार आहे.

हे देखील पहा :

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर सध्या ओबीसी फॅक्टर अधिक चर्चेत आहे. गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत ओबीसींच्या जागेवर भाजप आणि काँग्रेस नं ओबीसी उमेदवार दिले. त्यामुळं आगामी 10 डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीतही ओबीसी फॅक्टर कायम आहे. भाजपनं माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत ओबीसी चेहरा दिलाय.

बावनकुळे यांनी राज्यभर दौरे करत ओबीसींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं कॉंग्रेस पुढं बावनकुळे यांचं मोठं आव्हान आहे. काँग्रेसही जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत असून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना उमेदवारी देत असल्याचं कळतंय. त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यास ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत रंगणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे । राजेंद्र मुळक
वानखडे यांना धक्का; आर्यन खान प्रकरणात NCB च्या तपासावर हायकोर्टाचे प्रश्नचिन्ह!

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर भाजप ओबीसींच्या पाठीशी आहे, या सरकारच्या नाकर्तेपणा मुळं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं, मात्र ओबीसी म्हणून बावनकुळे यांना उमेदवारी दिल्याचं भाजपनं नाकारलंय.

एकूणच या निवडणुकीत गेल्या पदवीधर निवडणुकीचा इतिहास, जिल्हा परिषद निवडणूक आणि आगामी नागपूर महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर ओबीसी मतं आवल्याकडे कसे वळतील या अनुषंगान दोन्ही पक्षांनी ओबीसी उमेदवार दिले. यात कुणाला किती यश मिळतं यासाठी मात्र निकालाची वाट बघावी लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com