दिलासादायक : नांदेड जिल्हा कोरोनामुक्तीकडे; 55 रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या एक हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा तीन, कंधार तालुक्यांतर्गत दोन, हिंगोली एक तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड तालुक्यांतर्गत दोन असे एकूण आठ बाधित आढळले.
दिलासादायक : नांदेड जिल्हा कोरोनामुक्तीकडे; 55 रुग्णांवर उपचार सुरु
नांदेड जिल्हा कोरोनामुक्तीकडे

नांदेड : जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 347 एवढी झाली असून यातील 88 हजार 788 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 55 रुग्ण उपचार घेत असून यात एकाही बाधितांची प्रकृती अतिगंभीर नाही. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या एक हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा तीन, कंधार तालुक्यांतर्गत दोन, हिंगोली एक तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड तालुक्यांतर्गत दोन असे एकूण आठ बाधित आढळले.

हेही वाचा - अभ्यासाचं गाव तडवळे : जिल्ह्यातील पाहिलं अन् राज्यातील दुसरं !

बुधवारी (ता. १४) 55 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी तीन, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 10, किनवट कोविड रुग्णालय एक, हदगाव कोविड रुग्णालय एक, मुखेड कोविड रुग्णालय तीन, देगलूर कोविड रुग्णालय एक, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 23, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 12, खाजगी रुग्णालय एक व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याचा कोरोना मिटर

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 34 हजार 834

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 31 हजार 682

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 347

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 788

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.19 टक्के

बुधवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

बुधवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-26

बुधवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-68

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-55

बुधवारी रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com