नांदेड : पेट्रोलपंप व्यवस्थापकाला लुटणाऱ्या टोळीची पोलिस कोठडी वाढली

लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एम. गायकवाड यांनी या सात जणांना ता. 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.
सोनखेड लुटमार प्रकरणी पोलिस कोठडी
सोनखेड लुटमार प्रकरणी पोलिस कोठडी

नांदेड : सोनखेड परिसरातील शहिद पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाला लुटून त्याच्याकडील आठ लाख 43 हजार 160 रुपये लुटणाऱ्या सात जणांविरुध्द सोनखेड पोलिसांनी गुरुवारी (ता. १५) त्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे वाढविली. लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एम. गायकवाड यांनी या सात जणांना ता. 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.

ता. 10 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास जानापुरी ते वडेपुरी जाणाऱ्या रस्त्यावर शहीद दिलीप केंद्रे पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक नागनाथ शेषराव केंद्रे हे आठ लाख 43 हजार 160 रुपये बॅंकेत भरण्यासाठी जात असतांना जानापूरीच्या कमानीपासून 500 ते 700 मिटर अंतरावर त्यांची लुट झाली. ता. नऊ जुलै रोजी स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणातील राजू सत्यम जाधव (वय 24), रा. गोविंदनगर नवीन वळण रस्ता नांदेड, नागेश पोचिराम गायकवाड (वय 19) रा. नवीन वळणरस्ता नांदेड, अमोल बालाजी जाधव (वय 27) रा. मुगट, ता. मुदखेड, जितेश बाबूराव ढगे (वय 20) रा. होटाळा ता.नायगाव, माधव गणपत देवकर (वय 23) रा. घुंगराळा, ता.नायगाव आणि आकाश पंढरीनाथ पवळे (वय 20) रा. जानापुरी ता. लोहा या सात जणांना पकडले होते.

हेही वाचा - ऑनलाइन परीक्षेदरम्यान एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ता. 10 जुलै रोजी सोनखेडचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महादेव मांजरमकर यांनी या सात जणांना अटक केली आणि ता. 11 जुलै रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ता. 15 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. गुरुवारी (ता. 15) जुलै रोजी पोलिस कोठडी संपल्यावर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेची कलमे 395 आणि 397 ची वाढ करण्याचे पत्र न्यायालयाला दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामा पवार आणि लक्की उर्फ लक्ष्मण मोरे यांचा शोध घेणे आहे. यासाठी पोलिस कोठडी वाढवून देण्याची विनंती सरकारी वकील अॅड. गिरीश मोरे यांनी केली. न्यायाधीश व्ही. एम. गायकवाड यांनी या सातही जणांना ता. 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com