Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये सैराटची पुनरावृत्ती! बहिणीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला भर बाजारात संपवलं!

बहिणीला पळवून नेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका मेहुण्याने आपल्याच भावोजीची हत्या केली.
Nandurbar Crime News
Nandurbar Crime NewsSaam TV

Nandurbar Crime News : सैराटच्या पुनरावृत्तीने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. काही महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये बहिणीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणाची मेहुण्याने भररस्त्यात हत्या केली होती. आता असाच काहीसा प्रकार नंदुबारमध्ये घडला आहे. बहिणीला पळवून नेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका मेहुण्याने आपल्याच भावोजीची हत्या केली. (Latest Marathi News)

Nandurbar Crime News
Aurangabad Crime : प्रेमविवाहानंतर गरोदर प्राध्यापिकेनं संपवलं जीवन; मन हेलावून टाकणारी घटना

नंदुरबार (Nandurbar) शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरात शुक्रवारी (५ फेब्रुवारी) रात्री उशीरा ही घटना घडली. घटनेनंतर  पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान घटनेनंतर आरोपी हा स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली असून खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबारमध्ये आज (शनिवारी) अतिरिक्त कुमकसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात शांतता आहे.

Nandurbar Crime News
Satara Crime : पोलिस पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी; अमित भोसले हत्याकांडाचा १० दिवसानंतर छडा

नेमकं काय घडलं?

नंदुरबार शहरातील मच्छी बाजार चौकात राहणाऱ्या एका मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. त्यानंतर ती मुलगी आपल्या पतीसोबत राहत होती. बहिणीने पळून जाऊन लग्न केलं याचा राग भावाचा मनात होता. याच रागातून त्याने बहिणीच्या नवऱ्याला भर बाजारात गाठले आणि त्याची धारधार शस्त्राने भोसकून (Crime News) हत्या केली.

दरम्यान, हत्या केल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणापूर्ण वातावरण आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com