Nandurbar Accident News : जळगावच्या दिशेने जाणा-या Car चा बर्डीपाडा टोलनाक्यावर अपघात; महिला ठार, आठ जखमी

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.
Nandurbar Accident News
Nandurbar Accident Newssaam tv

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर (National Highway 6) नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा फाट्याजवळ टोल नाक्याचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

Nandurbar Accident News
'NCP चा वजीर 40 आमदारांसह गायब हाेणार, एका घरात दाेन मुख्यमंत्री हाेणार कसे ?' (पाहा व्हिडिओ)

घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी : गुजरात राज्यातील अहमदाबादहून जळगावच्या दिशेने जाणारे वाहन महामार्गावर टोलनाक्यावरील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कठड्याला जाऊन धडकल्याने मोठा अपघात झाला.

Nandurbar Accident News
Ramdas Athawale News : आम्ही मागून वार करीत नाही, आमची भूमिका स्पष्ट : रामदास आठवले

या भीषण अपघातात वत्सला गोवर्धन सोनवणे (वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आठ जणांना दुखापती झाली आहे. राष्ट्रीय क्रमांक सहावर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

बर्डीपाडा फाटा नजीक टोलनाक्याचे बांधकाम सुरू आहे. यादरम्यान याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणतेही सुचना व दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकांना मार्गक्रमण करताना अडचणी येत आहेत. तसेच या परिसरात वारंवार अपघाताची घटना घडत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com