Trimbakeshwar ला आजपासून Pay & Park ची अंमलबजावणी; भाविकांनाे ! जाणून घ्या वाहनांसाठीचा शुल्क

नगरपालिका प्रशासनाने पुर्ण तयारी केली आहे.
Trimbakeshwar Temple, Nashik
Trimbakeshwar Temple, Nashiksaam tv

Nashik News : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) खाजगी वाहनाने येणाऱ्या भाविकांना आता शहरात वाहन उभे करण्यासाठी तासानुसार पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. (Maharashtra News)

Trimbakeshwar Temple, Nashik
Shirdi त जाणा-या साईभक्तांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी (पाहा व्हिडिओ)

बारा ज्याेतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची श्रावण महिन्यात आणि महाविशिवरात्र काळात अलाेट गर्दी हाेत असते. या दाेन्ही काळात सुमारे लाख सव्वा लाखापेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात.

याचबराेबर त्र्यंबकेश्वरसह शहरातील कपालेश्वर, सोमेश्वर ही प्रमुख शिवमंदिरे भाविकांनी गजबजली असतात. त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून लाखाेंची गर्दी अनुभवायस मिळती. दरम्यान आता देश-विदेशातून येणा-या भाविकांना त्यांच्या वाहनांसाठी पार्कींग शुल्क द्यावे लागणार आहेत.

Trimbakeshwar Temple, Nashik
Palghar News : पाण्यासाठी आईची वणवण; चौदा वर्षाच्या प्रणवने चार दिवसांत खणली विहीर

यासाठी पालिकेकडून वार्षिक ठेका 45 लाख रुपयांना देण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासन शहरात 'नो पार्किंग'चे फलक लावणार आहे. तिथे वाहन उभे करणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार आहे.

मोटारसायकल, कार, बस अशा प्रकारातील वाहनांना पहिल्या आठ तासांसाठी अनुक्रमे 20, 50 आणि 80 रुपये पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रत्येक तासासाठी अनुक्रमे 10, 20 आणि 30 रुपये शुल्क घेतले जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com