Navapur Fake Police Crime: नकली पोलीस बनून आले अन्‌ दागिने घेऊन गेले; घटना सीसीटीव्ही कैमेरात कैद

Fake Policemen Took Away The Jewels: नकली पोलीस बनून आले अन्‌ दागिने घेऊन गेले; घटना सीसीटीव्ही कैमेरात कैद
Navapur Crime News
Navapur Crime NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : मोटारसायकलवरून जात असलेल्‍या व्‍यापारी असलेल्‍या इसमाला पोलिस असल्‍याचे सांगून, दागिने काढून घेण्यास सांगितले. पोलिस (Police) असल्‍याचा बनाव करत दागिने लुटून नेल्‍याचा प्रकार नवापूर (Navapur) शहरात घडला. सदर प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद झाला आहे. (Latest Marathi News)

Navapur Crime News
Nashik It Raids : नाशिकमध्ये आयकर विभागाचे छापे, बांधकाम व्यावसायिक आयकरच्या रडारवर

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात भरदिवसा डायमंड पोल्ट्रीचे मालक सुमनभाई प्रजापत मोटरसायकलने घरून पोल्ट्री फार्मकडे जात होते. या दरम्‍यान अचानक दोन युवकांनी आम्ही पोलीसवाले आहेत; पुढे लुट होत आहे. अंगावरील सोन्याचे दागिने काढून रुमालात बांधून घ्या. त्याप्रमाणे सुमन प्रजापत यांनी गळ्यातील चैन बोटातील अंगठ्या काढून रूमालात बांधले. त्यानंतर ते म्हणाले दाखवा तुम्हाला बांधता येत नाही आम्ही बांधून देतो.

Navapur Crime News
Shirdi News : 'साईं' च्या ठेवी... नकाे रे बाबा.., नाणी माेजताना बॅंक कर्मचा-यांना फुटताेय घाम (पाहा व्हिडिओ)

दागिने काढून रूमालाला मारली गाठ

त्या नकली पोलीस चोरट्यांनी हात चालाकी करत सोन्याचे दागिने काढून रुमालाला गाठ मारून प्रजापत यांच्या हातात दिली. त्यानंतर सुमन प्रजापत यांनी थोड्या वेळात रुमाल उघडून पाहिला; तर त्यात सोन्याचे दागिने नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. नकली पोलीस सोन्याचे दागिने घेऊन पोबारा झाले होते. यासंदर्भात प्रजापती यांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरेत मध्ये कैद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com