Nashik News : भाजपा कार्यकर्त्याने पत्नीसह संपवली जीवनयात्रा; धक्कादायक कारण समोर, परिसरात खळबळ

मालेगाव शहरातील डीके कॉर्नर भागात एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे
Nashik Malegaon News
Nashik Malegaon News Saam Tv

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील डीके कॉर्नर भागात एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. मंगळवारी (१० जानेवारी) रात्री हा प्रकार घडला. पंकज दिगंबर बिरारी (वय ४०) व रेणुका पंकज बिरारी (वय ३५) असे दाम्पत्याचे नाव आहे. (Nashik News Today)

Nashik Malegaon News
Jaiprakash Chhajed Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

घटना घडली त्यावेळी घरात कोणी नसल्याने उशिरा हा प्रकार लक्षात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज भाजपाचा धडाडीचा कार्यकर्ता होता. या दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कर्जबाजारीपणाला तसेच खासगी कंपनीने लावलेल्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

पंकज ने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे बोलले जाते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत घटनेची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.

प्रमोद आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या या प्रकरणी गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी सांगितले. अचानक प्रमोद याने पत्नीसह आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com