Nashik Crime : जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीला त्याने एका क्षणात संपवलं; नाशकातील मन सुन्न करणारी घटना

एका पतीने दारूच्या नशेत पत्नीला दांडक्याने मारहाण केली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला.
Nashik Crime News
Nashik Crime News Saam TV

तबरेज, शेख साम टीव्ही

Nashik Crime News : पती पत्नीचा वाद हा काही नवीन नाही. किरकोळ कारणावरून त्यांच्यात नेहमी भांडणं होतं असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात. तर काही वेळा ते विकोपाला जाऊन त्यातून गंभीर गुन्हे घडतात. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. एका पतीने दारूच्या नशेत पत्नीला दांडक्याने मारहाण केली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Nashik Crime News
Dharavi Fire : धारावीच्या झोपडपट्टीत भीषण आग; २५ हून अधिक घरं जळून खाक, अग्निशमन दलाचे २६ बंब घटनास्थळी

ही धक्कादायक घटना गंगापूर रोडवरील शिवाजी नगरातील पाझर तलावाजवळील झोपडपट्टीत घडली. विशेष म्हणजे पत्नी काम करताना खाली पडली, असा बनाव रचून पतीने हा खून दडविण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता हा खून असल्याचे उघड झाले.

त्यानुसार गंगापूर पोलिसांनी (Police) खुनाचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. मीरा पीनू पवार (वय ४० वर्ष) असे मृत पत्नीचे नाव असून पीनू सोमनाथ पवार (वय ४४ वर्ष) असे संशयित पतीचे नाव आहे. पोलिसांनी सोमनाथ याला अटक केली असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ पवार आणि त्याची मृत पत्नी मीरा पवार ह्या मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा चालवितात. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमी वाद (Crime News) होत होते. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

Nashik Crime News
Prithvi Shaw : क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणी वाढणार? सपना गिलने केले गंभीर आरोप

त्यावेळी आरोपी सोमनाथ याने दारूच्या नशेत पत्नी मीराला फावड्याच्या लाडकी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत मीरा यांच्या छातीला तसेच पोटाला जबर मार लागला. त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी सोमनाथ याने मीरा यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करुन ती काम करताना पडली, त्यामुळे तिला दुखापत झाल्याचे सांगितले.

डॉक्टरांनी तपासून मीरा यांना मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असता मीरा यांना जबर मारहाण करुन त्यांची हत्या झाल्याचा शवविच्छेदनाचा अभिप्राय गंगापूर पोलिसांना दिला. त्यानुसार पथकाने पवार याला ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचं उघड होताच, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com