Nashik News: रक्त तपासणीचे दिले खोटे रिपोर्ट; जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रक्त तपासणीचे दिले खोटे रिपोर्ट; जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : अशोका मार्ग परिसरात राहणाऱ्या महिलेचे रक्त तपासणीचे खोटे रिपोर्ट दिले. महिलेच्या (Nashik News) जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात मुंबई नाका पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Nashik News
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्‍हा वाढ; दोन दिवसात वाढले १२०० रूपये

नाशिकमधील रेणुकानगर परिसरात राहणारी एक संशयित महिला आणि कामटवाडे परिसरात राहणारा संशयित उदय नारायण सिंग यांच्याविरोधात हा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. रिझवान रमजान भोख यांच्या फिर्यादीनुसार रिझवान यांची पत्नी यांच्या रक्त तपासणीचा रिपोर्ट संशयित दोघांनी संगनमताने खोटा तयार करून दिला.

रिपोर्टमुळे चुकीचे औषधोपचार

रक्‍ताचे रिपोर्ट चुकीचे दिल्‍यामुळे सदर महिलेला संशयितांकडून चुकीचे औषधोपचार सुरू केले. यामुळे महिलेच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास मुंबई नाका पोलिस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com