Nashik Accident News: वणी-सापुतारा महामार्गावर भयानक अपघात; ४ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Vani Saputara Highway Accident: वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्याजवळ कार आणि क्रुझरमध्ये समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले.
Nashik News Major Car and Cruser Accident vani saputara Highway 4 Person Death 9 Injured
Nashik News Major Car and Cruser Accident vani saputara Highway 4 Person Death 9 Injured Saam TV

अजय सोनवणे, साम टीव्ही

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्याजवळ कार आणि क्रुझरमध्ये समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik News Major Car and Cruser Accident vani saputara Highway 4 Person Death 9 Injured
Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

विनायक गोविंद क्षिरसागर (वय ३७), योगेश दिलीप वाघ (वय १८), जतिन अनिल पावडे (वय २३) आणि रवींद्र चव्हाण (सर्व राहणार वणी) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची (Accident News) माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कमळी युवराज गांगोडे (वय ४०), कल्पना सुभाष सोळसे (वय १९), तुळशीराम गोविंदा भोये (वय २८), ललीता युवराज कडाळे (वय ३०), रोहिदास पांडुरंग कडाळे (वय २५), योगेश मधुकर सोळसे (वय १५), सुभाष काशिनाथ सोळसे (वय १५), देवेंद्र सुभाष सोळसे (वय ४७), नेहल सुभाष सोळसे (वय ७) अशी जखमींची नावे आहेत.

Nashik News Major Car and Cruser Accident vani saputara Highway 4 Person Death 9 Injured
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातात २५ जणांचा मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील चौघे मृत मित्र सातपुऱ्याकडून वणीच्या (Nashik News) दिशेने येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या क्रुझर गाडीने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

कारमधील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातातील नऊ गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आले आहे. दरम्यान एकाच वेळी वणी गावातील ४ होतकरु तरुणांचा मृत्यु झाल्याने वणी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच वणी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com