
तबरेज शेख
नाशिक रोड : विहितगाव परिसरातील भरदिवसा झालेल्या लुटीच्या घटनेचा अवघ्या दोन दिवसात उलगडा करण्यात नाशिकरोड (Nashik) पोलिसांना यश आले. कर्जदारांच्या तकाद्याला वैतागून फिर्यादीनेच लुटीचा बनाव रचल्याचे चौकशीत समोर आले. (Tajya Batmya)
देवळाली गावात अशपाक खाटीक याचे मोहम्मदीया चिकन सेन्टर असून बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीने जात असताना विहितगाव सिग्नलजवळ बिना नंबरच्या मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी त्याची दुचाकी (Crime News) अडवली. धारदार शस्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख तीन हजार रुपये आणि दुचाकी घेऊन पोबारा केला. आधीच वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकरोड पोलिसांसमोर आव्हान उभे केलेले असताना त्यात या घटनेने भरच घातली होती.
तपासात काहीच आले नाही समोर
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या विहितगाव परिसरातील सिग्नल जवळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण अशपाक म्हणतो त्याप्रमाणे काहीच आढळले नाही. घटनेबाबत परिसरातील नागरिकांकडे विचारपूस केली; तेव्हा त्यांनीही ना कोयत्याने धाक दाखवला गेला, ना लुटीची घटना घडली, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अशपाक यास ताब्यात घेऊन त्यास बोलते केले.
अन् त्याने दिली कबुली
आपल्यावर खूप कर्ज झाले असून कर्जदार पैशांसाठी सारखे तकादा लावत आहेत. त्यामुळे आपणच हा लुटीचा बनाव रचला कारण आपण संकटात असल्याचे बघून तरी कर्जदार काही दिवस थांबतील, असे अशपाकने पोलिसांकडे कबुल केले. या आधारे फिर्यादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.