Jayant Patil News: 'कुछ तो मजबूरीयां रही होगी, यू ही कोई बेवफा नही होता' जयंत पाटलांची तूफान फटकेबाजी

Jayant Patil on Eknath Shinde : महाविकासआघाडीच्या नागपूर येथील वज्रमूठ सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी तूफान फटकेबाजी केली.
NCP leader Jayant Patil
NCP leader Jayant Patil saam tv

Maha Vikas Aghadi Nagpur Vajramuth Sabha: नागपूर येथे आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. यासभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी तूफान फटकेबाजी केली. 'कुछ तो मजबूरीयां राही होगी, यू ही कोई बेवफा नही होता' असा शेर म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्र आज वाट बघतोय की कधी निवडणुका लागतात. आता सरकार देखील निवडणूका घेईना झालंय. सरकारला या अथांग जनसागराची धडकी भरली आहे. महाराष्ट्र सरकारला जर आपण जनतेत लोकप्रिय आहोत असं वाटत असेल तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेपासून ते राज्यातील सगळ्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

NCP leader Jayant Patil
Vajramuth Sabha : मोठी बातमी! अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या सभेला अनुपस्थित राहणार! स्वत: सांगितले कारण

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, त्यांची छाती नाहीये, हे सरकार निवडणूकांना घाबरतंय. या सरकारला लोकांपुढं जाण्याची इच्छा नाहीये त्यामुळे आता अलिकडच्या काही दिवसांत इव्हेंट करण्याचे कार्यक्रम होत आहेत. लोकं कशामुळे जमतील हे पाहून ते कार्यक्रम घेतात. तिथे जाऊन उभे राहतात आणि आमची लोकप्रियता किती आहे हे दाखवतात. पण महाराष्ट्र काही दुधखुळा नाही असा टोला जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे साहेब जे सोडून गेले त्यांना गद्दार म्हणतात. पण उद्धवजी मला आपल्याला सांगायचं आहे की, 'कुछ तो मजबूरीयां राही होगी, यू ही कोई बेवफा नही होता'. काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबूरी असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल, समजलो अब क्या करेंगे, असे म्हणत जयंत पाटलांनी शिवसेनेला (शिंदे गट) टोला लगावला.

NCP leader Jayant Patil
Prithviraj Chavan on Pm Narendra Modi : नरेंद्र मोदी जवाब दो! त्या 40 शहीद जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

नरेंद्र मोदी जवाब दो! पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

पृथ्वीराज चव्हाण या सभेत बोलताना म्हणाले आहेत की ''पंतप्रधान यांचं ज्यांच्यावर विशेष प्रेम होतं, ज्यांना चार वेळा राज्यपाल केलं गेलं आणि त्या वेळेचे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय जवानांवर जो हल्ला झाला, बॉम्ब स्फोटाने 40 जवान शहीद झाले. त्या हल्ल्याबद्दल काही तथ्य त्यांनी पुढे मांडली.''

''हजार सीआरपीएफ जवानांना जम्मू येथे घेऊन जायचं होतं. विमानाची मागणी केली, दिलं नाही. 300 किलो स्फोटक घेऊन वाहने शेजारी फिरत होती. सुरक्षा यंत्रणांना कळलं नाही. त्या 40 शहीद जवानांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे. आज देशातील जनता नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत आहे. नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जवाब दो!" असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com