Hapus Mango: देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्य़ाची विक्री; खवय्यांची फसवणूक

देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्य़ाची विक्री; खवय्यांची फसवणूक
Hapus Mango
Hapus MangoSaam tv

पंढरपूर : फळांचा राजा आंबा..तोही कोकणातील म्हटलं की देवगडच्या हापूस आंब्याचे सर्वात आधी नाव पुढे येते. परंतु याच देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली (Karnataka) कर्नाटकातील इतर जातीच्या (Mango) आंब्याची चढ्या दराने विक्री केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हा दिवसाढवळ्या प्रकार पंढरपुरात सुरु आहे. (Latest Marathi News)

Hapus Mango
Sangli News: पत्‍नी नांदायला येत नाही म्‍हणून गेला पोलिसात अन्‌; पोलिसांची उडाली तारांबळ, जमली बघ्यांची गर्दी

अक्षय तृतीयेपासून येथील बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. यामध्ये स्थानिक गावरान आंब्यासह कर्नाटकातील आंब्याचाही समावेश आहे. सध्या कोकणातील देवगड, रत्नागीरीच्या हापूससह केशर आंब्याला खवय्यांची मागणी अधिक आहे. हिच संधी साधून स्थानिकांसह परगावच्या व्यापार्यांनी बाजारात व रस्त्यावर देवगड हापूस म्हणून कर्नाटकातील विविध जातीचे आंबे विक्रीसाठी आणले आहेत.

Hapus Mango
Nandurbar News: ३२ लाखाहून अधिकचा अवैध गुटखा जप्त; नंदुरबार पोलिसांची कारवाई

हापूसचे उत्पादन घटले

कोकणातील देवगडच्या हापूस आंबा जगभर प्रसिध्द आहे. त्यामुळे येथील आंब्याला देश विदेशातून मोठी मागणी असते. दरम्यान यंदा नैसर्गिक संकटामुळे हापूसचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे यंदा बहुतांश देवगड हापूस निर्यात झाला आहे. त्यामुळे लहान शहरातील व खेेडेगावातील लोकांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळणे तसे कठीणच झाले आहे. याच नामी संधीचा गैरफायदा अनेक व्यापारी घेत असल्याचे दिसून आले आहे. देवगड हापूसला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातीच्या आंब्याची विक्री करणे हे सेवा व वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. तरी काही व्यापारी व विक्रेते पणनचे नियम पायदळी तुडवून राजरोसपणे हापूसच्या नावाखाली इतर जातीच्या आंब्याची सर्रासपणे विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com