Pune Fraud News: जादा परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकांची १४ कोटींची फसवणूक

Fraud With Businessmen In Pune: जादा परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकांची १४ कोटींची फसवणूक
Pune News
Pune NewsSaam tv

अक्षय बडवे

पुणे : कृषी उद्योगात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल. असे आमिष दाखवून २४ व्यावसायिकांची १४ कोटी रुपयांची (Fraud) फसवणूक झाल्‍याचा प्रकार (Pune) पुण्यात समोर आला आहे. (Live Marathi News)

पुणे येथील व्यावसायिकांना आरोपींनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हळदीचे उत्पादन घेणार आहोत. कृषी उत्पादनात ही कंपनी अव्वल असल्याची बतावणी करून त्यांनी गुंतवणूकदारांकडून १३ कोटी ८२ लाख ८७ हजार रुपये घेतले. परंतु त्यांना परतावा आणि मुद्दलही परत केले नाही. सन २०१९ पासून हा प्रकार सुरू होता.

Pune News
Nashik Crime News: नाशिक पुन्‍हा हादरले..मुंबईहून आई– वडील भेटायला आले, दरवाजा उघडताच बसला धक्‍का

गुन्‍हा दाखल

या प्रकरणी अकोला येथील एका ६३ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. चतु:शृंगी पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रशांत झाडे, रोहन मताले, संदेश गणपत खामकर, जयंत रामचंद्र बांदेकर, कमलेश महादेवराव ओझे आणि ए. एस. ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com