Pune Crime News: सिगारेटसाठी 20 रुपये दिले नाही, मुलाने आईसोबत केलं धक्कादायक कृत्य

Pune Police: याप्रकरणी तरुणाविरोधात पोलिसांनी (kondhwa police station) गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv

Pune News: पुण्यामध्ये (Pune) एका तरुणाने आईलाच माराहण करत जखमी केले आहे. सिगारेट (cigarettes) घेण्यासाठी पैसै न दिल्यामुळे या तरुणाने हे कृत्य केले आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात पोलिसांनी (Kondhva Police) गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News
Virar Crime News: धक्कादायक! आईचा डोळा लागताच ४ वर्षीय मुलाला पळवले; लोहमार्ग पोलिसांकडून एकास अटक

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोंढवा परिसरात राहणाऱ्या माधव राजाराम कांबळे (वय 27 वर्षे) याने आपल्या आईला लाकडी बाबूंने मारहाण केली. सिगारेटसाठी 20 रुपये दिले नाही त्यामुळे या तरुणाने आपल्या आईच्या मनगटावर बाबूंने जोरात फटका मारला. यामध्ये त्याच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला. याप्रकरणी आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी माधवविरोधात गुन्हा दाखल केले आहे.

Pune Crime News
Pune Fire News: मोठी बातमी! इमारतीला भीषण आग; 30 नागरिक इमारतीतच अडकले

माधवच्या आईने दिलेल्या तक्रारीत असे सांगितले आहे की, घरी असताना त्यांचा मोठा मुलगा माधव कांबळे याने त्यांच्याकडे सिगारेटसाठी 20 रुपये मागितले. त्यांनी न दिल्याने त्याने आरडाओरडा केला. तेव्हा त्यांचा छोटा मुलगा शंकर याने त्याला घराबाहेर जा असे सांगितले. तेव्हा माधव हा घरा बाहेरुन लाकडी बांबू घेऊन आला. त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने माझ्या हाताच्या मनगटावर जोरात मारले. त्यात माझा फ्रॅक्चर झाला. याबाबत कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com