Pune Accident: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात, पती-पत्नींचा जागीच मृत्यू

Pune Police: कोंढवा पोलिस (Kondhawa Police) या अपघाताचा तपास करत आहे.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam tv

Pune News: पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये (Pune Accident) पती-पत्नींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर हा अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोंढवा पोलिस (Kondhawa Police) या अपघाताचा तपास करत आहे.

Pune Accident News
Palghar Fire News : कासा बाजारपेठेतील पाच दुकाने जळून खाक; कोट्यावधींचे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. इस्कॉन टेंपल चौकाजवळील आरएमडी शाळेसमोर ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Pune Accident News
Accident News: दुचाकीला धडक देत भरधाव कार पुलाखाली कोसळली; सात जण गंभीर जखमी

ज्ञानेश्वर वाल्मिक लवांडे (वय ५०, रा. बाणेर गाव, पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. ज्ञानेश्वर लवांडे आपल्या पत्नीसोबत बाणेरवरून कोथळे पुरंदरकडे जात होते. दहाव्याच्या कार्यक्रमासाठी ते दुचाकीवर जात होते. याच दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com