Wine खरेदीत महिलेची फसवणुक, सायबर सेलचा तपास सुरु : अशाेक दुधे

ashok dudhe
ashok dudhe

- राजेश भोस्तेकर

रायगड : ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक हे प्रलोभनांना बळी पडतात आणि आपली फसवणूक करून घेतात. याबाबत ऑनलाईन खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेऊन अशा प्रलोभनांना बळी पडू नका असे आवाहन रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी रायगडकरांना केले आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सायबर सेल आणि तज्ज्ञांच्या मदत घेतली जाणार असल्याचे दुधे यांनी स्पष्ट केले. raigad-superintendent-of-police-ashok-dudhe-appeals-citizens-to-take-care-while-buying-online-products-sml80

ashok dudhe
पुणे-मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू; प्रवास होणार अवघ्या 40 मिनिटांत

अलिबाग येथे एका महिलेस ऑनलाईन पद्धीने वाईन खरेदी करताना एक लाख ४४ हजारांचा फटका बसला. तिने या संदर्भात पाेलिसांत धाव घेतली. अलिबाग पोलिसांनी सध्या तरी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान जिल्ह्यात अनेक नागरिक ऑनलाईन पद्धतीने वस्तु खरेदी करीत असतात. ही खरेदी करताना नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना व्यवसायिक हे विविध संदेशाद्वारे जाहिराती करीत असतात. काही वेळा ग्राहक त्यांच्या याेजनांना बळी पडतात आणि नेमकी तेथेच त्यांची फसवणूक हाेती.

ग्राहक हा फसल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतो. मात्र ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घेऊन आपला ओटीपी कोणालाही न देता, कॅश ऑन डिलिव्हरी सारखे पर्याय वापरले तर फसवणूक होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी भूलथापांना बळी न पडता खरेदी करावी असे आवाहन पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यात घडलेले गुन्हे हे सायबर सेल आणि तज्ज्ञांच्या मदतीने लवकरच उघडकीस आणू. ऑनलाईन खरेदी करताना नागरिकांनी खात्रीशिर माहिती करुनच खरेदी करावी असेहीजिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे ashok dudhe यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com