तृतीयपंथीयांपुढे हात जाेडलेल्या अधिका-याने CS ना केली 'ही' मागणी

तृतीयपंथीयांपुढे हात जाेडलेल्या अधिका-याने CS ना केली 'ही' मागणी
health officer

सातारा : वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नियुक्त केलेला असतात. तरीही दाखल असलेल्या रुग्णाला घेऊन तृतीयपंथी transgender बाह्य रुग्ण विभागात आले होते. कोणाच्याही तोंडाला मास्क mask नसल्याने त्यांना लांब थांबण्यास सांगितले. त्यावरून त्यांनी टाळ्या वाजवत गोंधळ घातला. नंतर जिल्हा शल्यचिकित्संकाच्या civil surgeon कार्यालयातील गोंधळ दबावातून घालत माफी मागायला लावणे अत्यंत चुकीचे आहे. माझी या प्रकरणात कोणतीही चूक नाही असे स्पष्ट करीत जिल्हा शल्यचिकित्सकांनी झाल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना health officer संरक्षण देणे आवश्यक असल्याची मागणी येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिका-याने पत्रकाच्या माध्यमातून केली आहे. (register-case-against-transgenders-demands-health-officer-satara-marathi-news)


जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात बुधवारी (ता. 7) काही तृतीय पंथीयांनी गोंधळ घालत एका वैद्यकीय अधिका-यास माफी मागायला लावली. त्याचे चित्रीकरण करून प्रसारित केले. याबाबत संबंधित वैद्यकीय अधिका-याने आज पत्रकाद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. ते म्हणाले, काल मी बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासात होतो. त्या वेळी पाच ते सहा तृतीय पंथीय मास्क न लावता आत आले. आमचा पेशंट दोन दिवसापासून दाखल आहे, त्याचा सिटीस्कॅन काढायचा आहे असे त्यांचे म्हणणे होते. दुसरा रुग्ण पहात असल्याने मी त्यांना थोडे थांबा असे सांगितले. त्यांना मास्क लावण्याच्या सूचनाही केल्या. परंतु, त्यामुळे चिडून त्यांनी टाळ्या वाजवत गोंधळ घालायला सुरवात केली.

तरीही बाह्य रुग्ण कक्षात गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात टाळ्या वाजवत गोंधळ घालण्यात आला. तेव्हा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. हा सर्व प्रकार सिसिटीव्हीमध्ये कैद आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही केवळ त्यांच्या सर्वांच्या धमकीमुळे तसेच या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी मला माफी मागायला लावल्यामुळे मी तसे केले.

health officer
साताऱ्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी

माझ्याकडून तृतीय पंथीयांना कोणतेही अपशब्द वापरले गेले नाही. प्रत्यक्षात जिल्हा शल्यचिकित्सकांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला संरक्षण देत संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी काम कसे करणार असा प्रश्नही संबंधित वैद्यकीय अधिका-यांने उपस्थित केला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com