Sangamner APMC Election: महाविकास आघाडीच्या प्रचारात सत्यजीत तांबे सहभागी, मामा-भाच्याचा विखेंवर निशाणा

Sangamner Bazar Samiti Election: अहमदनगर जिल्ह्यातील आजी माजी महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात दोन्ही नेत्यांनी पॅनल उभे केल्याने पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
Sangamner APMC Election
Sangamner APMC ElectionSaam Tv

सचिन बनसोडे

Ahmednagar News: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राजकीय पक्षांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आजी माजी महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात दोन्ही नेत्यांनी पॅनल उभे केल्याने पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. (Latest Marathi news)

संगमनेर येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अपक्ष आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले. यावेळी त्यांनी नाव न घेता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे.

Sangamner APMC Election
Bharat Gaurav Train: पुण्यातून 28 एप्रिलला धावणार पहिली ट्रेन 'भारत गौरव'; जाणून घ्या काय आहे खास?

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता आणि संगमनेर (Sangamner) हे आजी-माजी महसूलमंत्र्यांचे मतदारसंघ आहे. दोन्ही तालुके एकमेकांच्या शेजारी आहे मात्र आज पर्यंत या दोन्ही नेत्यांचे कधी जमलेच नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संगमनेर मध्ये विखेंच्या नेतृत्वात तर राहात्यात थोरात यांच्या नेतृत्वात पॅनल उभे करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी गावात महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाची प्रचाराची सभा संपन्न झाली. यावेळी अपक्ष आमदार सत्यजित तांबे देखील मामा थोरात यांच्यासोबत प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. यावेळी मामा भाच्याने विखेंवर टीका करत हे दहशतीचे वातावरण आपल्या तालुक्यात येऊ द्यायच नाही अस आवाहन केल आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना ज्यांनी विरोध केला ते पुढच्या निवडणुकीत त्यांच्या बरोबर दिसले हा इतिहास आहे. पलीकडून एक विमान निघालेल आहे त्याला ना पायलट ना त्यांच्यात इंधन अशी अवस्था आहे. हे विमान कुठं तरी धडकल्याशिवाय राहणार नाही, फक्त ते आपल्या तालुक्यात धडकून आपलं नुकसान होणार नाही, यासाठी आहे तसे विमान परत पाठवण्याच काम आपल्याला करायचं आहे अशी टीका सत्यजीत तांबे यांनी विखेंच नाव घेता केली आहे.

विशेष म्हणजे नाशिक पदवीधर निवडणुकीत विखे यांनी उघडपणे सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रथमच सत्यजीत तांबे यांनी टीका केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाषणातून टीका करताना विखे पाटलांना अनेक टोले लगावला आहे.

Sangamner APMC Election
Ramdas Kadam News : रामदास कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मुलांविरोधात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?

मी महसूलमंत्री होतो, अनेक काम केली मात्र आता जे महसूलमंत्री झाले त्यांनी पहिली मिरवणूक संगमनेरला काढली आणि घोषणा दिली.. हमसे जो टकरायेगा मिटी मे मिल जायेगा...तेव्हा पासून केवळ जिरवाजिरवीचे काम सुरू केल आहे. आम्ही असं काय केलं की हा त्रास दिला जातोय असा सवाल थोरात यांनी केला. तसेत डॉ सुधीर तांबे यांना सुद्धा अनेकदा खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

खातं मी सुद्धा सांभाळलं, खूप संधी असते कामं करायला मात्र असा लोकांचा छळ करण्यात काय अर्थ.. हे दहशतीचे वातावरण आपल्याला इकडे येऊ द्यायचं नाही उलट राहाता तालुक्यातील वातावरण दुरुस्त करण्याची जबाबदारी आपली आहे असं काम आता आपल्याला करायचं आहे. निवडणुकीच मतदान केंद्र अशा ठिकाणी शोधलं की ते लवकर सापडणार नाही. किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा आहेत का नाही? आपण ही मंत्री होतो असे उद्योग केले का असा थेट सवाल थोरात यांनी केला आहे. (Maharashtra News)

बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा आजी - माजी महसूलमंत्र्याचा वाद रंगणार असून थोरात यांच्या टीकेला आता विखे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com