Sangli Crime News: बापरे! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला तपासून केलं मृत घोषित; भावाला राग अनावर होताच उचललं मोठं पाऊल, VIDEO

याबाबत गांधी चौक पोलिसांत संदीप गोटे (वय ४०) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News
Crime Newssaam tv

Sangli News: सांगलीमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. सांगलिच्या मिरज सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांनी एका रुग्णाला जिवंत असूनही मृत घोषित केलं. मिरज सिव्हिलमध्ये डॉक्टरांनी तपासणी करून विनोद गोटे या रुग्णाला मृत घोषित केल्याने रुग्णाच्या भावाने डॉक्टरांवर हल्ला केला. याबाबत गांधी चौक पोलिसांत संदीप गोटे (वय ४०) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Hospital)

Crime News
Parbhani Crime News : व्हॉट्सअपवर व्हॉईस मॅसेज करून दिला घटस्फोट; मग पत्नीने शिकवला चांगलाच धडा

समोर आलेल्या अधिक माहितीनुसार, मिरज शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात अतिदक्षता विभागात रविवारी विनोद ज्ञानबा गोटे (राहणार मिरज) यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णाला मृत घोषित करण्यात आले.

विनोद गोटे यांचा भाऊ संदीप गोटे यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांना राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या अंगावर धावून जात 'तू पेशंटला पाहिले आहेस का' असे विचारत त्यांचा गळा दाबून मागे ढकलले. या झटापटीमध्ये डॉ.विजय कदम यांच्या उजव्या हाताला लागल्याने ते जखमी झाले आहेत.

अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरला मारहाण केल्याबद्दल संदीप गोटे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा गांधी चौकी पोलिसांनी दाखल केला आहे. मात्र या सर्वांमध्ये डॉक्टकांनी केलेली चूक देखील किती मोठी होती हे समजते. या घटनेमुळे डॉक्टरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com