SSC HSC Exam: दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेत वेळ वाढवून मिळणार

SSC HSC Exam: . दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वेळ वाढून मिळणार आहे.
SSC HSC Exam
SSC HSC Examsaam tv

SSC HSC Exam: दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वेळ वाढून मिळणार आहे. यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याआधी 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका आकलनासाठी वाचनासाठी निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे अनेक ठिकाणी कॉपीच्या घटना समोर येत होत्या. त्यामुळे आता या वर्षीपासून 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने रद्द केला आहे.

SSC HSC Exam
Shivjayanti In Agra : आग्रा किल्ल्यात 'जय शिवाजी, जय भवानी' जयघोष घुमणार! शिवजयंती साजरी करण्यास अखेर परवानगी

दरम्यान यंदा पेपरच्या आधीची 10 मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जाणार नाहीत, त्यामुळे बोर्डाने पेपरच्या नंतर हे 10 मिनिटे वाढवून द्यावेत अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती. या मागणीला बोर्डाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. (Latest Marathi News)

SSC HSC Exam
Tamil Nadu : सहलीला गेल्या पुन्हा परतल्याच नाही; नदीत बुडून 4 विद्यार्थिनींचा मृत्यू

पालकांची ही मागणी बोर्डाकडून मान्य करण्यात आली आहे. या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत. त्यानुसार आता निर्धारीत वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. (SSC HSC Exam)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com