Nylon Manja : नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री थांबवा, नागपूर खंडपीठाचे सायबर सेलला आदेश

नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा, असं न्यायालयाने सायबर सेलला सांगितलं आहे.
 Nylon Manja Nagpur Bench Orders Cyber Cell
Nylon Manja Nagpur Bench Orders Cyber Cell Saam TV

नागपूर : एकीकडे प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्रीवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे मांज्याची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. हीच बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सायबर पोलिसांना महत्वाचे आदेश दिले आहे. नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा, असं न्यायालयाने सायबर सेलला सांगितलं आहे.

 Nylon Manja Nagpur Bench Orders Cyber Cell
Nitesh Rane : २०२४ मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू; नितेश राणेंचा घणाघात

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन मांज्या विक्रीचे प्रकार वाढले आहे. मांजामुळे होणारे नुकसान पाहता, त्याची विक्री थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजन करा व यावर एक आठवड्यात अहवाल सादर करा, असे आदेशच नागपूर खंडपीठाने सायबर पोलिसांना दिले आहेत.

ऑनलाईन मांज्या विक्रीसंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, इंडिया मार्ट इंटरमेश कंपनी व फेसबुक इंडिया ऑनलाइन सर्व्हिसेसच्या वेबसाइटवरून नायलॉन मांजा विकल्या जात असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.

 Nylon Manja Nagpur Bench Orders Cyber Cell
Mumbai Dagadi Chawl Fire : मुंबईतील दगडी चाळीतील इमारतीला आग, १ तासानंतर...

दरम्यान, न्यायालयाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली. ऑनलाईन मांज्या विक्री थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे आदेश न्यायालयाने सायबर पोलिसांना दिले आहेत. दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजा प्रतिबंधाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

फोर्समध्ये जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महामेट्रोचे महाव्यवस्थापक आदींचा समावेश आहे. याशिवाय, ग्रामपंचायतस्तरावर तलाठ्याच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com