Delhi Sultanpuri Case: दिल्ली प्रकरणात मोठा ट्विस्ट; सातवा आरोपी स्वतःच आला शरण, घटनेचं गूढ उलगडणार?

यात धक्कादायक बाब म्हणजे अंकुश स्वत:च शरण आला आहे.
Delhi Sultanpuri Case
Delhi Sultanpuri CaseSaam TV

Delhi Sultanpuri Case: दिल्लीच्या कंझावाला अपघात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत. नववर्षाचे आगमन होत असतानाच २० वर्षीय तरुणीचा कारने १2 किलोमिटर फरपटत नेल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी कार आणि अन्य पाच जणांना अटक केली आहे. वाहनचालकासह अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींमध्ये आता आणखीन एक आकडा वाढला आहे.

अंकुश असे सातव्या आरोपीचे नाव आहे. यात थक्क करणारी बाब म्हणजे अंकुशने स्वत: आत्मसमर्पण केलं आहे. शुक्रवारी रात्री सुलतानपुरी पोलीस ठाण्यात त्याने आत्मसमर्पण केलं. (Latest Delhi Sultanpuri Case News)

शुक्रवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी शोध घेत कार मालकाला अटक केली आहे. अशुतोष असे या कारमालकाचे नाव आहे. इतर आरोपी १ जानेवारीच्या पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी रोहिणीच्या सेक्टर १ मध्ये पोहचले होते. यावेळी अशुतोषही तिथे होता अशी माहिती समजली आहे. तसेच चौकशीत त्यानेच अपघातानंतर इतर आरोपींना पळून जाण्यासाठी रिक्षा कारून दिल्याचे म्हटले जात आहे.

Delhi Sultanpuri Case
Delhi Mayor Election : दिल्ली महापालिकेत मोठा गोंधळ, भाजप अन् आप नगरसेवकांमध्ये राडा

सदर घटनेत मृत मुलीच्या मैत्रिणीला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचे म्हटले जात होते. मैत्रीण घडलेली घटना व्यवस्थित सांगत नाही. गोष्टी लपवत आहे आणि पोलिसांच्या अडचणी वाढत आहे म्हणून तिला अटक करण्यात आली असे म्हटले जात होते. मात्र पोलिसांना या बाबत विचारले असता असे नसून तिला फक्त चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि नंतर परत सोडून दिले, असे सांगितले आहे.

Delhi Sultanpuri Case
Delhi Sultanpuri Case: दिल्ली कांझावाला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा अपघात की हत्या? 'त्या' व्हिडिओनंतर गूढ वाढलं

आतापर्यंत काय काय झालं?

१ जानेवारी - पोलिसांना तरुणीचा मृतदेह कांझावला इथं सापडला.

पोलिसांनी अपघाताच्या कलमाखाली गुन्हा दाखल करुन ५ आरोपींना अटक केली.

२ जानेवारी – पोलिसांनी सांगितलेल्या माहितीवरच प्रश्नचिन्ह

आरोपींच्या कलमात वाढ... निष्काळजीपणामुळे मृत्यूचं कलम ३०४ लावलं.

३ जानेवारी - प्रकरणात नवा वळण, पीडित तरुणीची मैत्रीणीची एन्ट्री

अपघाताच्या वेळी तरुणीची मैत्रीण तिच्यासोबत होती.

मैत्रिणीला तरुणीला नशेत असल्याचे सांगितले.

४ जानेवारी - शवविच्छेदन अहवालात दारुचा कुठेही उल्लेख नाही.

मैत्रिणीच्या घरी येण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह, पीडितेच्या कुटुंबीयांनी मैत्रिणीचे दावे खोटे असल्याचे सांगितले

५ जानेवारी - मैत्रीण आणि तरुणीचा नवीन व्हिडीओ समोर आला

या प्रकरणात एकूण ७ आरोपी असल्याची पोलिसांची माहिती

६ जानेवारी - मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. तसेच एका आरोपीने आत्मसमर्पण केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com