Talathi Exam 2023: तलाठी परीक्षेत यंत्रणा फेल! अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन; हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा

Server Down in Talathi Bharati Exam Centre: अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने मुलांचा खोळंबा झाला आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Server Down in Talathi Bharati Exam Centre
Server Down in Talathi Bharati Exam CentreSaamtv

Talathi Bharti Exam News: तलाठी भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ काही संपण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता आता तलाठी परिक्षा असलेल्या अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने मुलांचा खोळंबा झाला आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Server Down in Talathi Bharati Exam Centre
Sana Khan Case Update: सना खान हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पोलीस तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

याबाबत अधिक माहिती अशी की, आज राज्यात तलाठी भरती परीक्षा (Talathi Bharati Exam) होत आहे. यावेळी परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर, अकोला (Akola), अमरावती (Amaravati) आणि नागपूर (Nagpur) या जिल्ह्यात सर्व्हर डाऊन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे.

सकाळी ९ वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला. अकोल्यातील परीक्षा केंद्रावर संतप्त विद्यार्थ्यांनी काही वेळासाठी रास्ता रोको केला. पोलीस प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांची समजूत काढत सर्वर पूर्ववत झाल्यास परीक्षेचा वेळ वाढवून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Server Down in Talathi Bharati Exam Centre
Husband End Life due to Wife : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून ३० वर्षीय पतीने जीवन संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

तसेच इंटरनेट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेर ताटकळत थांबावे लागले. याबाबत प्रशासनाकडून सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये तलाठी भरती प्रतिक्रियेत हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला होता. वॉकीटॉकीच्या साहाय्याने पेपर फोडण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. ज्यानंतर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com