Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government : '...तर या सरकारचा मृत्यू अटळ', संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

Latest News : नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.
Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government
Sanjay Raut On Shinde-Fadnavis GovernmentSaam tv

Nashik News: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधला आहे. 'हे सरकार बेकायदेशीर आहे. ते तीन महिन्यात जाणार. या सरकारचा मृत्यू अटळ आहे.', अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government
Uddhav Thackeray Press Conference : 'देशात नंगानाच सुरू, त्याला चाप लावा'; उद्धव ठाकरेंचे थेट PM नरेंद्र मोदींना आवाहन

संजय राऊत यांनी सांगितले की, 'कोणी कितीही बदमाशी करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वोच्च न्यायालयाची ही लक्ष्मणरेखा डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही. हे सरकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार. या सरकारचा मृत्यू अटळ आहे.'

तसंच, 'शिंदे आणि फडणवीसांनी कितीही काय म्हणूद्या. त्यांचे पोपटलालांनी सुद्धा काहीही म्हणूद्या हे सरकार जातंय.' या भाषेत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीसांचा समाचार घेतला आहे. तसंच, 'उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर आहे. आम्ही सत्तेसाठी भूकेलेलो नाही. आम्ही सत्ता सोडली आहे.', असं त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government
Ajit Pawar On Uddhav Thackeray: '...यातून जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला', उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचे स्पष्ट मत

बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश कोणत्याही अधिकाऱ्यांनी पाळू नयेत. नाहीतर तुम्ही अडचणीत याल असं माझं आवाहन असल्याचे देखील संजय राऊतांनी सांगितले. 'हे सरकार तीन महिन्यात जाईल. नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येतील. सुपडा साफ होईल. जगात कोणत्या तोंडाने सामोरं जाल?', असा सवाल त्यांनी केला आहे.

यावेळी संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. त्यांनी सांगितले की, 'मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो त्यांनी संपूर्ण सरकारच बेकायदेशीर ठरवले आहे. असे बेकायदेशीर सरकार वाचलं वाचलं असं म्हणणारे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करत आहेत. त्यांचे चेहरे बघा असे वाटत आहे की ते आतून रडत आहेत. फक्त 3 महिने त्यांनी मरण पुढे ढकलले.', असं देखील ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com