Palghar News : अरेच्चा एवढ्या मोठ्या गावात २२ वर्षांपासून मतदानच झालं नाही; कोणत्या समस्येने घेरलं आहे चंडीगाव?

गेल्या २२ वर्षात चंडीगाव या गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतींचा प्रचार करणे किंवा ग्रामपंचायत साठी मतदान अशी संधीच मिळालेली नाही.
Palghar News
Palghar NewsSaam TV

Palghar News : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काही गावातील वाद विकोपाला गेलेला आपण अनेक वेळा पाहिले असेल. मात्र पालघर येथील चंडीगाव या गावात मागच्या २२ वर्षात गावकऱ्यांनी सरपंच पाहिला नाही. या गावात ग्रामपंचायत सरपंच पद आणि ७ पैकी ४ सदस्य पदांच्या जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केल्या आहेत. मात्र गावात एकही अनुसूचित जमातीचा मतदार नाही. त्यामुळे उमेदवार आणायचा कुठून असा प्रश्न या गावकऱ्यांसमोर मागील उभा आहे. यामुळे गावात निवडणूक होत नाही. (Latest Gram Panchayat News)

डहाणूच्या उत्तरेस चंडीगाव ग्रामपंचायत आहे. गावातील एकूण लोकसंख्या १३०० च्या घरात तर साडेनऊशेच्या जवळपास मतदार आहेत. गावातील बहुतांशी कुटुंब ही कुणबी समाजाची आहेत. मात्र चंडीगाव या ग्रामपंचायत हद्दीत एकही अनुसूचित जमातीचा मतदार नसल्याने मागील २२ वर्षात येथे सरपंच झालेला नाही. जिल्ह्यात लागू असलेला पेसा कायदा यामुळे या भागातील सर्व ग्रामपंचायतींवर सरपंच आणि सदस्य पदांच्या जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या आहेत.

Palghar News
Palghar Crime : पहाटे रनिंग करण्यासाठी घराबाहेर पडली; २० वर्षीय तरुणीसोबत घडली भयंकर घटना

कोण पाहतंय गावाचा कारभार?

सध्या या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी पाहत आहेत. मात्र या सगळ्यामुळे गावातील विकास कामांना खिळ बसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. सरपंचाबरोबर गावात ग्रामपंचायत सदस्य नसल्याने गावकऱ्यांनी ग्रामसभा आणि मासिक सभेकडे पाठ फिरवली आहे. तसेत आपल्या समस्या ऐकण्यासाठी कोणी नाही या भावनेने गावकरी नाराजी व्यक्त करत आहेत. शासनाने या गावाची दखल घेत गावात इतर जातीच्या व्यक्तींना सरपंच आणि उमेदवारीची संधी द्यावी अशी मागणी ग्रामस्त करत आहेत.

Palghar News
Sangli Nagar Panchayt 2022 : सांगलीत 3 नगरपंचायत आणि 1 महापालिका पोटनिवडणूकसाठी मतमोजणी

गेल्या २२ वर्षात चंडीगाव या गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतींचा प्रचार करणे किंवा ग्रामपंचायत साठी मतदान अशी संधीच मिळालेली नाही. सर्व कारभार हवा तसा नसल्याने गावकरी फार संकटात आहे. अनेक वेळा ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासक त्यांच्या कामासाठी तालुक्याला जात असतात. अशात यावेळी कार्यालये बंद असल्याने गावकऱ्यांना महत्वाचे दाखले मिळवण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. अन्याथा काही दिवस वाट पाहावी लागते. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com